Tuesday, May 21, 2024
घरमानिनीFashionCurd Benefits For Skin: उन्हाळ्यात त्वचेसाठी बेस्ट आहे दही फेसपॅक

Curd Benefits For Skin: उन्हाळ्यात त्वचेसाठी बेस्ट आहे दही फेसपॅक

Subscribe

कोणताही ऋतु असो, त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते. कारण धूळ आणि प्रदूषणामुळे अनेकदा टॅनिंगची समस्या निर्माण होते. उन्हाळ्यात त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आणि चेहरा चमकदार बनवण्यासाठी अनेकजण घरगुती उपाय करतात. दही देखील यापैकीच एक आहे. दही लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का की, दह्याचा फेस पॅक त्वचा सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. उन्हाळ्यात त्वचेसाठी दही फेसपॅक उपयुक्त ठरू शकतो. चेहऱ्याला दही लावल्याने कोणते फायदे होतात आणि ते चेहऱ्यावर कसे लावायचे ते जाणून घेऊयात.

दह्याच्या फेसपॅकचे फायदे :

  • उन्हाळ्यात दही लावल्याने चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो. उन्हाळ्यातील उन्हामुळ त्वचेचा रंग काळसर होतो. अशामध्ये चेहऱ्यावर दही वापरल्याने त्वचेचा रंग उजळू लागतो.
  • उन्हाळ्यात चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलावर नियंत्रण ठेवण्यासाठी, चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी दही उत्तम आहे.
  • दही वापरल्याने  टॅनिंग, मुरुमं, डाग दूर होण्यास मदत होते. चेहऱ्यावर दही लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्याही दूर होतात.
  • कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध असलेल्या दहीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे मुरुम कमी करण्यास मदत करतात.
  • दह्याचा वापर चेहऱ्यावर मसाज करण्यापासून ते स्क्रबिंगपर्यंत करता येतो.

फेसपॅक कसा बनवायचा :

दही पॅक बनवण्यासाठी दोन चमचे दही, अर्धा चमचा हळद, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घ्या. एका भांड्यात हे सगळे पदार्थ एकत्र करा. तयार झालेलं मिश्रण चेहऱ्याला लावा. 20 मिनिटं तसंच चेहऱ्यावर राहू द्या. पॅक सुकल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

- Advertisement -

आहारात दह्याचा समावेश :

दुपारच्या जेवणानंतर तुम्ही तुमच्या आहारात दहीचा समावेश करा. याशिवाय तुम्ही ताकाचे देखील सेवन करु शकता. एवढेच नाही तर तुमचा आवडता रायता तयार करा आणि त्याचा आहारात समावेश करा. दह्याचे सेवन केल्याने तुमची पचनक्रिया निरोगी राहते आणि शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

हेही पाहा :

 

- Advertisement -

________________________________________________________________

Edited By : Nikita shinde

- Advertisment -

Manini