घरमहाराष्ट्रनागपूरकाँग्रेसच्या आढावा बैठकीत हाणामारी; नाना पटोलेंसमोरच भिडले दोन गट, पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर

काँग्रेसच्या आढावा बैठकीत हाणामारी; नाना पटोलेंसमोरच भिडले दोन गट, पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर

Subscribe

काँग्रेसची नियमित आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसमधील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या बैठकीतच काही कारणावरून ठाकरे विरुद्ध जिचकार वाद उफाळून आला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोरच कार्यकर्ते भिडले.

काँग्रेसची नियमित आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसमधील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या बैठकीतच काही कारणावरून ठाकरे विरुद्ध जिचकार वाद उफाळून आला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोरच कार्यकर्ते भिडले. नरेंद्र जिचकार आणि विकास ठाकरे या दोनही नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. (Congress Clash at Congress review meeting Two groups clashed in front Nana Patole internal party disputes Narendra Jichkar vikas Thackeray )

नेमकं काय घडलं?

काँग्रेसच्या आढावा बैठकीला सुरूवात नागपूर शहर काँग्रेसच्या आढावा बैठकीपासून झाली. बैठकीची सुरूवात नाना पटोले यांच्या संबोधनाने झाली. बैठकीचा उद्देश आणि पुढील निवडणुकींच्यादृष्टीने तयारीवर नाना पटोलेंनी भूमिका स्पष्ट केली. संपूर्ण बैठकीत अनेक विषयांवर भाष्य झाले. त्यानंतर शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी बैठकीत समारोपीय मत मांडलं आणि बैठक संपली अशी घोषणा केली. त्यातच प्रदेश महासचिव नरेंद्र जिचकर माईकजवळ आले आणि त्यांनी विकास ठाकरे यांचा माईक घेण्याचा प्रयत्न केली. तेव्हा विकास ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र जिचकार यांना व्यासपीठावरून खाली खेचलं आणि धक्काबुक्की केली. त्याच जिचकार यांच्यासह काही कार्यकर्त्यांचे कपडे फाटले.

- Advertisement -

काही खुर्च्यांची फेकाफेक झाली. या गोंधळात नरेंद्र जिचकार यांना बाजूच्या खोलीत नेण्यात आलं. त्यानंतर साधारण एक तास सभागृहात गोंधळाची स्थिती शांत होत नव्हती. त्यामुळे नंतर नाना पटोलेंसह, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, नितीन राऊत, विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी सर्व नेत्यांनी बैठकीतून काढता पाय घेतली.

काही नेते वेटिंग रुममध्ये गेले तर विजय वडेट्टीवार व सुनील केदार सभागृहाच्या बाहेर गेले. नेत्यांना सुरुवातीला विकास ठाकरे बैठक ठिकाणावरून दुसरीकडे पाठवण्यात आलं. नंतर नागपूर ग्रामीणची बैठक सुरू झाली. त्या बैठकीत नरेंद्र जिचकार यांनी शिरण्याचा प्रयत्न केली तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांना हुसकावून लावलं. शेवटी नरेंद्र जिचकार यांना सभागृहातून बाहेर पाठवण्यात आलं. त्यानंतर पुन्हा एकदा बैठक सुरू करण्यात आली.

- Advertisement -

(हेही वाचा: अहो चित्राताई… अशानं हसं होतं; चित्रा वाघांच्या ‘त्या’ पोस्टवरून रोहिणी खसडेंनी सुनावलं )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -