Friday, December 8, 2023
घरमानिनीस्वयंपाकघरातील काही उपयुक्त टिप्स

स्वयंपाकघरातील काही उपयुक्त टिप्स

Subscribe

एका गृहिणीचा जास्त वेळ स्वयंपाक घरातच जातो. रोजच्या जेवणासोबतच कधी-कधी महिला घरच्यांसाठी स्पेशल डिश देखील तयार करतात. त्यासाठी आज आम्ही काही खास टिप्स घेऊन आलो आहोत.

 •  गुलामजाम हमखास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात.

Gulab Jamun Recipe: How to make Gulab Jamun Recipe for Holi at Home | Homemade Gulab Jamun Recipe - Times Food

- Advertisement -

 

 •  मेदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा. वडे कुरकुरीत होतात.
 •  कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा. त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात.
 •  ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे. वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे. ताक आंबट होत नाही.

Taak Recipe (Maharashtrian Spiced Buttermilk) + Video - Whiskaffair

- Advertisement -
 • छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी चार पाच वेळा तुरटी फिरवावी. सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले मऊ होतात.
 • पकोड्यांसाठी पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका, पकोडे अधिक कुरकुरीत होतील.

Onion Pakodas | Air Fryer, Oven and Stove Top Recipe - Ministry of Curry

 • कोणताही नवा पदार्थ बनवताना त्यात थोडं मीठ टाका ज्यामुळे पदार्थाचा स्वाद वाढेल.
 • भात करताना त्याच्या पाण्यात 1 चमचा मीठ, काही थेंब लिंबाचा टाका, ज्यामुळे भात सुटसुटीत होतील.
 • हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन पीठ मिसळा, यामुळे हलवा चविष्ठ होईल.

  हेही वाचा :

  ‘या’ घरगुती उपायांनी हटवा कपड्यांवरचे डाग

- Advertisment -

Manini