घरदेश-विदेशमोहन भागवतांच्या जिवाला नक्षलवादी संघटना आणि आयएसआयचा धोका; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

मोहन भागवतांच्या जिवाला नक्षलवादी संघटना आणि आयएसआयचा धोका; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

Subscribe

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत 10 फेब्रुवारीला भागलपूरला येणार आहेत. दरम्यान, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय, अतिरेकी आणि नक्षलवादी संघटनांनी मोहन भागवत यांना धमकी दिली आहे. त्यानंतर केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

सिल्क सिटी म्हणून ओळख असलेल्या भागलपूरमध्ये मोहन भागवत येत्या 10 फेब्रुवारीला जाणार आहेत. यानिमित्ताने याठिकाणी सिल्क सिटीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. कुप्पा घाट आश्रम येथेही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. आश्रमात काम करणाऱ्या व्यक्तीपासून ते येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकावर पोलिसांची यावेळी नजर राहणार आहे.

भागलपूर पोलीस प्रशासन मोहन भागवत येणार असल्याने आधीच सतर्क झाले आहेत. एसएसपी आनंद कुमार आणि एसडीओ सदर धनंजय कुमार सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात अखिल भारतीय संतमत महासभेच्या परमहंस जी महाराज यांच्या कुप्पा घाट आश्रमाचे नियामक मंडळ सुरक्षा व्यवस्थेबाबत पदाधिकाऱ्यांशी सतत संपर्कात असल्याचेही सांगण्यात येत आहे. पोलीस अधिकारी आणि आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी संघप्रमुखांची आश्रमाला भेट आणि त्यांच्या कार्यक्रमाशी संबंधित गोष्टींवर सविस्तरपणे चर्चा केल्याची देखील सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

मोहन भागवत हे भागलपूर येथे येणार असल्याने आणि त्यांच्यावर दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सुरक्षा यंत्रणांशी संबंधित अधिकाऱ्यांची पथके गेल्या तीन दिवसांपासून शहराला भेट देऊन आजूबाजूच्या भागातील सुरक्षा व्यवस्था आणि हालचालींवर देखील लक्ष ठेऊन आहेत.

भागलपूर हे नेपाळ सीमेजवळ असल्याने सीमेजवळ असलेल्या अररिया, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, नवागचिया, भागलपूर, बांका येथे होत असलेल्या हालचालींवरही सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत.

- Advertisement -

भागलपूरमध्ये सर्वत्र ठेवण्यात आला पोलीस बंदोबस्त 
बरारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मायागंज येथील महर्षी मेही परमहंसजी महाराज यांच्या कुप्पा घाट येथे भेटीच्या निमित्ताने एसएसपी आनंद कुमार यांनी आपल्या पोलीस पथकासह या ठिकाणाला भेट दिली आहे. यानंतर या जागेची पाहणी देखील पोलीस पथकाकडून करण्यात आली आहे. तसेच येथील सुरक्षा व्यवस्थेबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – आंध्र प्रदेशात तेलाचे टँकर साफ करताना सात मजुरांचा मृत्यू

दरम्यान, मोहन भागवत यांच्यावर हल्ला होणार असल्याच्या बातमीमुळे मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच 10 फेब्रुवारीला मोहन भागवत 4 तास भागलपूरमध्ये असणार आहेत. यावेळी ते ज्या मार्गावरून प्रवास करणार आहेत त्या मार्गांवर आणि गंगा नदीच्या आजूबाजूच्या परिसरात देखील पोलिसांकडून नजर ठेवण्यात येणार आहे. एसडीएम धनंजय कुमार हे देखील वारंवार आश्रमाच्या संपर्कात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -