Tuesday, April 30, 2024
घरमानिनीHealthTurmeric Water : रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्या, निरोगी राहा

Turmeric Water : रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्या, निरोगी राहा

Subscribe

हळद जशी जेवणाची चव वाढवते तसेच शरीराच्या इतर समस्यांवरही हळदीचा वापर केला जातो. आरोग्यासाठी हळद खूप फायदेशीर मानली जाते. हळद एक औषधी वनस्पती असून त्यात अनेक प्रकारचे अँटी ऑक्सीडेन्ट असतात. अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरणारी हळद पाण्यात टाकून रिकाम्या पोटी घेतल्यास अनेक फायदे होतात.

हळदीचे पाणी पिण्याचे फायदे –

- Advertisement -

पचनक्रिया सुधारते – सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पायल्याने पचनक्रिया निरोगी राहते, तुम्हाला जर वारंवार पचनक्रियेसंबंधित त्रासाला सामोरे जावे लागत असेल तर हळदीचे पाणी नक्की प्या.

वेटलॉस – सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हळदीचे पाणी शरीरात फॅट्स जमा होण्यापासून रोखते.

- Advertisement -

रोगप्रतिकारशक्ती – रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्याने संसर्गाशी लढण्यास मदत होते.

हृदय निरोगी राहते – हळदीच्या पाण्याने बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. हळदीच्या पाण्याचे नियमित रिकाम्या पोटी सेवन केल्यास हृदयासंबंधित आजारांचा धोका कमी होतो.

कॅन्सर – हळदीमध्ये ट्युमर विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे हळदीचे पाणी प्यायल्याने बऱ्याच अंशी कॅन्सरचा धोका कमी होतो.

सायनस – सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्याने सर्दी आणि सायनसची लक्षणे दूर होण्यास मदत होते.

लिवर – तुम्हाला जर तुमचे लिवर डिटॉक्स करायचे असेल तर सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी नक्की प्या.

त्वचेसाठी फायदेशीर – हळदीचे पाणी त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. तुम्ही जर रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्याल तर तुमची त्वचा ग्लो होण्यास मदत होते.

जखमा बऱ्या होतात – हळदीचे पाणी पायल्याने जखमा लवकर बऱ्या होतात तसेच सांधेदुखीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

हळदीचे पाणी बनविण्याची कृती –

  1. एक ग्लास पाणी घ्या. ते गॅसवर उकळवत ठेवा.
  2. आता यात एक छोटा चमचा हळद टाका.
  3. पाण्यात हळद एकजीव होऊ द्या.
  4. पाणी थंड झाल्यावर तुम्ही ते पिऊ शकता.

 

 

Edited By – Chaitali Shinde


हेही पहा : शुगरची भीती वाटतेय मग हे बदल करा

 

- Advertisment -

Manini