घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रLok Sabha 2024 : विशाल पाटील भाजपाची बी टीम, अखेर चंद्रहार पाटील...

Lok Sabha 2024 : विशाल पाटील भाजपाची बी टीम, अखेर चंद्रहार पाटील बोललेच

Subscribe

Lok Sabha Election 2024 : गेल्या कित्येक दिवसांपासून शांत असलेल्या मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी तलवार म्यानातून उपसली असून विशाल पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

सांगली : सांगली लोकसभेतून मविआकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण यामुळे काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी नाराजी व्यक्त करत सांगलीतून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. ज्यामुळे सांगली लोकसभेत मविआची डोकेदुखी वाढली आहे. बाकीचे सगळे उमेदवार गौण आहेत, संजय काकांना पाडू शकणारा खरा पैलवान आता निवडणुकीत उतरलाय, अशी टीका विशाल पाटलांनी चंद्रहार पाटलांचे नाव न घेता केली. त्यामुळे सांगलीतील राजकीय वातावरण तापले आहे. पण आता विशाल पाटलांच्या टीकेवर चंद्रहार पाटील यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे. (Lok Sabha Election 2024 Chandrahar Patil reply to Vishal Patil criticism)

मविआने उमेदवारी न दिल्याने संतापलेल्या विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला असून प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. या प्रचारसभांच्या माध्यमातून ते मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधत आहेत. पण त्यांच्या टीकेला आता शांत असलेल्या चंद्रहार पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विशाल पाटील ना मातीतला ना राजकारणातील पैलवान आहे. विशाल पाटील जर स्वतःला पैलवान म्हणून घेत असतील तर आम्ही पैलवानांनी आणि कुस्ती क्षेत्राने काय करावे? असा प्रश्न चंद्रहार पाटील यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : …याची किंमत मोजावी लागेल, मिटकरींचा राणांना इशारा

तर, मविआमध्ये बंडखोरी केल्यामुळे काँग्रेस विशाल पाटलांवर कारवाई करणार आहे. सत्ता असताना संजय पाटील यांनी आणि विशाल पाटलांनी काय विकास केला आहे, हे सर्वांना माहीत आहे. या दोघांची कामगिरी पाहता ही निवडणूक एकतर्फी आहे. विशाल पाटील हे भाजपाची टीम बी आहे. भाजपाकडून पाकिट घेऊन पाकिट या चिन्हावर विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आहे. महाविकास आघाडीतून ते बाहेर पडले आहेत. ते अपक्ष उमेदवार आहे, त्यांनी बंडखोरी केले हे अजून त्यांच्या लक्षात आले नाहीये, असा सणसणीत टोलाच चंद्रहार पाटील यांनी विशाल पाटील यांना लगावला आहे.

- Advertisement -

त्यामुळे आता गेल्या कित्येक दिवसांपासून शांत असलेल्या मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी तलवार म्यानातून उपसली असून विशाल पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. तर विशाल पाटील यांनीही आपल्या विरोधी उमेदवाराविरोधात म्हणजेच चंद्रहार पाटलांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्यामुळे सांगली लोकसभेत निवडणुकीची रंगत वाढली आहे. विशाल पाटील हे महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू असल्याने त्यांचे सांगलीच्या राजकारणात वजन आहे. त्याशिवाय ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष देखील होते. ज्यामुळे त्यांचा जनतेमध्येही उत्तम प्रभाव आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : ही चंदीगडचीच पुनरावृत्ती; पंतप्रधान मोदींवर उद्धव गटाचा हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -