Sunday, May 12, 2024
घरमानिनीपावसाळयात झाडांची अशी घ्या काळजी

पावसाळयात झाडांची अशी घ्या काळजी

Subscribe
पावसाळ्याचे आगमन झाले आहे. यावेळी तुम्ही तुमच्या आरोग्याची जशी काळजी घेता, तशी झाडांची देखील घ्यावी. जर तुम्ही बाल्कनीत झाडे लावली आहेत आणि पावसाच्या पाण्यापासून झाडांचे कसे सुरक्षित ठेवावे.
 पावसाच्या पाण्यामुळे झाडे खराब होऊ लागली आणि पावसाळ्यात काही झाडे कुजून जाण्याची देखील शक्यता असते. मग अशा वेळी झाडांची काळजी कशी घ्याची हे कळत नाही. यासंदर्भात आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत.

या आहेत टीप्स

  • कुंडातील पाण्याचा निचरा होत नसेल तर झाडांची मुळे ही कुजू लागतात. यामुळे कुंडीला छिद्र नसेल तर रोप बाहेर काढून घ्यावी आणि कुंडीला 1-2 छिद्र करून घ्यावी.
  • पावसाळ्यापूर्वी कुंडीच्या ड्रेनेज सिस्टम बघावी.
  • झाडे जुने असेल तर पावसाळ्याच्या सीजनमध्ये त्यांची माती बदलण्याचा चांगला सीजन असतो.
  • रोपांची छाटणी करण्याचा हा बेस्ट सीजन असतो. रोपांची छाटणी केल्यास नवीन फांद्या येतात.
  • कुंडीच्या मातीत शेणखत आणि गांडूळ खत टाकावे, जेणेकरून झाडांना चांगले खत मिळाले.
  • जेव्हा जोरदार पाऊस असेल, तेव्हा झाडे पावसाच्या थेट संपर्कात येतील, अशा ठिकाणी झाडे ठेवून नका. झाडे ही शेडमध्ये ठेवावी.
  • झाडांची जी पाने पिवळी झाली आहेत किंवा ज्या पानांना किड लागले आहेत. ती पाने तोडून टाकून द्यावी.
  • झाडांचे कपड्यांपासून संरक्षण करण्यासाठी कडुलिंबाच्या तेलात १, लिटर पाणी एकत्र करून झाडांवर फवारणी करावी.
- Advertisment -

Manini