घरमहाराष्ट्रमी वाचलो आणि कुटुंबाला पण वाचवले..., अनंता रामा पारधीने सांगितली कहाणी

मी वाचलो आणि कुटुंबाला पण वाचवले…, अनंता रामा पारधीने सांगितली कहाणी

Subscribe

सारीका सावंत : खालापूर तालुक्यातील सर्वानाच हदरवणारी घटना 19 जुलैच्या रात्री 10:30 वाजता चौक परिसरातील इर्शाळवाडीवर दरड कोसळ्याने (Irshalwadi landslide) काळाने झडप घातली आणि जवळपास पाऊण गाव या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या भयानक घटनाक्रमाचे कथन येथील एक पारधी (Pardhi) कुटुंबातील बचवलेल्या तरुणाने केले. मी वाचलो आणि कुटुंबाला ही वाचवले; मात्र आता या ठिकाणी राहणे नाही, असा निश्चिय येथील बचावलेल्या नागरिकांनी केला असल्याचे समोर आले. (I survived and saved the family too story told by Ananta Rama Pardhi)

हेही वाचा – इर्शाळगड दरड दुर्घटना : शिवभोजन थाळीच्या पॅकेटचे मोफत वाटप, भुजबळांनी दिली माहिती

- Advertisement -

या घटनास्थळी मदत कार्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून या ठिकाणची माहिती घेत असताना एक चिखलात माकलेली बॅग घेऊन उभा असणाऱ्या तरुणांकडे विचारणा करीत असताना आपणच या घटनेतून बचावलो आणि कुटुंबाला वाचवले असल्याचे त्याने सांगितले. या घटनाक्रमाचे कथन करताना अनंता रामा पारधी (Ananta Rama Pardhi) याने सांगितले की, 10:30 वाजता मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला. कानोसा घेत असताना मातीचा ढिगारा बाजूला असणाऱ्या आंब्याच्या झाडांना आणि आमच्या घरावर आदळला. घराची भिंत आणि छप्परच आमच्या अंगावर पडले आणि आम्ही दबले गेलो. अर्धातासाच्या कालावधीनंतर मी कसातरी त्या ढिगाऱ्याखालून कुटुंबाला धीर देत बाहेर पडलो आणि एक एक करत आठ जणांना बाहेर काढले. यात माझी पत्नी, आई-वडील, पाहुणी आलेली बहीण, तिचा नवरा आणि मुले, असे आठ जण बचावलो; मात्र बाजूला पाहिले तर आवाज देणेही शक्य नव्हते, कारण सर्वत्र मातीचा ढिगाराच.

हेही वाचा – Irshalwadi landslide : इर्शाळवाडी येथे बचावकार्यासाठी मुंबई महापालिकेची यंत्रणा रवाना

- Advertisement -

पावसाच्या सरी आणि काळोख. या ठिकाणी पाच सहा मुल वायफाय वर पबजी खेळत होते. तेही घराच्या बाहेर असल्यामुळे बचावले होते. आता आम्ही सर्वजण सुखरूप आहोत, पण आमच्या गावातील रात्रीच्या दरम्यान जवळपास 225 हुन अधिक लोकांपैकी 100 पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले आहेत. यात तीन होमगार्डही असल्याची माहिती पारधी याने कथन करताना सांगितली. काबाडकष्ट करून दमून भागून आलेले सर्वजण आनंदात झोपी जाणार असतानाच, हा हसता गाव नष्ट झाल्याचे भयानक वास्तव अनंता पारधी याने कथन केले.

हेही वाचा – Irshalwadi landslide : राज ठाकरेंनी महिनाभरापूर्वीच इर्शाळवाडीबाबत केलेले विधान खरं ठरलं

इर्शाळवाडी संभाव्य दरडप्रवण ठिकाणाच्या यादीत नव्हते

रायगडच्या चौक-मानवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इर्शाळवाडी या आदिवासी बांधवांच्या वस्तीवर दरड कोसळल्याची घटना काल (19 जुलै) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत गावातली अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं ही दुर्घटना घडल्याचे म्हटले जात आहे. दुर्घटनास्थळ दुर्गम असल्याने त्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्यासाठी आवश्यक असणारी जेसीबीसारख्या मशीन घटनास्थळी पोहोचविण्यासाठी अडथळे येत आहेत. दोन हेलिकॉप्टरही रेक्स्यू ऑपरेशनसाठी तयार आहेत, मात्र खराब हवामानामुळे ते अजूनही उड्डाण करू शकले नाहीत.
इर्शाळवाडीमध्ये एकूण 48 कुटुंब राहत असून तेथील लोकसंख्या 228 एवढी आहे. मात्र अनेक लोक नोकरीच्या कामानिमित्त बाहेर गावी जात असतात, त्यामुळे ही दुर्घटना घडली त्यावेळी वाडीत नक्की किती लोक होती हे समजू शकलेले नाही. मुख्य म्हणजे इर्शाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण (जीएसआय) विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरड प्रवण ठिकाणाच्या यादीत नव्हते, अशी माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. अंधार आणि मुसळधार पावसामुळे बचावकार्य आज थांबवण्यात आले असून उद्या पहाटे पुन्हा बचावकार्याला सुरूवात होणार आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून 98 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र अजूनही अनेकजण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -