Sunday, May 12, 2024
घरमानिनीHealthहिवाळ्यातील श्वसनविकारापासून व्हा सावध

हिवाळ्यातील श्वसनविकारापासून व्हा सावध

Subscribe

हिवाळ्यात अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. थंड हवामानामुळे अनेक आजार बळावतात आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते. याचा परिणाम अनेकांच्या श्वसनमार्गावर होतो. विशेषत: दीर्घकाळापासून फुप्फुसाचे विकार असलेल्यांना हिवाळ्याचा जास्त त्रास जाणवतो. कोरड्या हवेमुळे रुग्णांच्या श्वसनमार्गात अडथळा निर्माण होतो. घरघर लागते, खोकला येतो शिवाय धापही लागते.

श्वसनविकार कमी करण्यासाठी उपाय

Lung Health in the Winter | PulmonaryFibrosisNow.org

- Advertisement -
  • आंबट फळे, आंबट पदार्थ, आईस्क्रिमसारखे थंड पदार्थ खाण्याचे टाळा.
  • दररोज प्राणायम करावा त्यामुळे श्वसनविकार टाळता येतात.
  • हिवाळ्यात उब राखण्यासाठी पुरेसे गरम कपडे घाला. तसेच पोषक आहार घेणे आणि पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे.
  • आंबट फळे, आंबट पदार्थ, आईस्क्रिमसारखे थंड पदार्थ खाण्याचे टाळा.
  • तुम्ही अस्थमाचे रुग्ण किंवा सीओपीडीचे रुग्ण असाल, तर काही झटपट आराम देणारी औषधे कायम जवळ बाळगा आणि या आजारांची लक्षणे जाणवू लागल्यास ती त्वरेने घ्या.
  • शरीर उबदार राखण्यासाठी शक्य तेवढी हालचाल करा. तुम्ही घरात असलात, तर एक तासाहून अधिक काळ बसून राहू नका. हालचाल करत राहा.
  • गरम पेये मुबलक प्रमाणात घ्या आणि शक्य असल्यास दिवसातून एकदा तरी गरम जेवण घ्या. हिवाळ्यात वेळेवर खाल्ले असता ऊर्जा चांगली राखण्यात मदत होते.
  • थोडीशी काळजी घेतली आणि नियोजन केले, तर हिवाळ्यात निरोगी राहण्याची शक्यता वाढेल.

हेही वाचा :

‘या’ रामबाण उपायाने दूर करा अ‍ॅसिडीटी

- Advertisment -

Manini