घरक्राइमCanada : हिंदू मंदिरांवर हल्ला करणारा गजाआड, द्वेषमूलक गुन्हे नसल्याचे पोलिसांकडून स्पष्टीकरण

Canada : हिंदू मंदिरांवर हल्ला करणारा गजाआड, द्वेषमूलक गुन्हे नसल्याचे पोलिसांकडून स्पष्टीकरण

Subscribe

ओटावा : कॅनडाच्या ओंटारियो प्रांतात गेल्या काही महिन्यांत हिंदू मंदिरांवर अनेक हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमुळे देशात जातीय तणावही वाढला. याप्रकरणांचा पाठपुरावा करून कॅनडा पोलिसांनी 41 वर्षीय जगदीश पंढेरला अटक केली आहे. त्याच्यावर इतर अनेक खटले सुरू असून सध्या तो जामिनावर बाहेर होता. गेल्या वर्षीही त्यांनी काही प्रार्थनास्थळांना लक्ष्य केले होते.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : ‘त्या’ 23 जागांबाबत संजय राऊतांचा पुनरुच्चार; म्हणाले, काँग्रेसने तर…

- Advertisement -

एका व्यक्तीने 8 ऑक्टोबर रोजी हिंदू मंदिरात प्रवेश केला आणि त्याने मंदिराचे नुकसान केले. तसेच तेथील दानपेटीतील मोठी रक्कम घेऊन निघून गेल्याचे सुरक्षेसाठी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले होते. याबाबत सखोल तपास करत असताना, त्या व्यक्तीने डरहम आणि ग्रेटर टोरंटो येथील अनेक मंदिरांमध्ये त्याने असेच कृत्य केल्याचे समोर आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. तथापि, या घटना मंदिरांमध्ये घडल्या असल्या तरी त्यांना द्वेषमूलक गुन्हे किंवा द्वेषातून घडलेल्या घटना म्हणता येणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. सप्टेंबरपासून ओंटारियोमध्ये जवळपास सहा मंदिरांचे नुकसान करण्यात आले आहे.

हेही वाचा – Aditya L1 संदर्भात मोठे अपडेट; 6 जानेवारीला L1 बिंदूवर पोहोचणार, ISRO ची माहिती

- Advertisement -

मंदिरांच्या तोडफोडीचा मुद्दा हिंदू समाज सातत्याने मांडत आहे. आतापर्यंत नुकसान झालेल्या मंदिरांमध्ये पिकरिंगमधील देवी मंदिर, अजाक्समधील संकट मोचन मंदिर आणि ओशावा येथील हिंदू मंदिराचा समावेश आहे. याशिवाय ग्रेटर टोरंटोमध्येही तीन मंदिरांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 2021 मध्येही अशा काही घटना घडल्या होत्या. अशी एकूण 18 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

यापूर्वी मार्च 2022 मध्येही हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली होती. त्यात जगदीश पंढेर हा एक होता. याशिवाय गुरशरणजीत धिंडसा, परमिंदर गिल आणि गुरदीप पंढेर यांनाही अटक करण्यात आली आहे. या लोकांनी हिंदू मंदिरांचे नुकसान तर केलेच, परंतु जैन मंदिरे आणि गुरुद्वारांचीही तोडफोड आणि लूटही केली होती.

हेही वाचा – Gautam Adani Meet Sharad Pawar: गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट; सुप्रिया सुळेही हजर, चर्चांना उधाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -