घरठाणेHealth : जिल्हा सामान्य रुग्णालयात २० खाटांचा वातानुकूलित कक्ष

Health : जिल्हा सामान्य रुग्णालयात २० खाटांचा वातानुकूलित कक्ष

Subscribe

वाढत्या उष्म्यामुळे आरोग्य विभाग सतर्क

ठाणे – मागील काही दिवसांपासून ठाण्यात उष्म्याने रौद्ररूप धारण केल्याने प्रचंड तापमान प्रमाणात वाढले आहे. ठाण्याचे तापमान ४२ अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. त्यामुळे आरोग्य विभागही सतर्क झाला असून, वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी २० खाटा असलेला विशेष वातानुकूलित कक्ष तयार करण्यात आला आहे. यासह जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांत उष्णतेपासून बचाव करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

मे महिन्यामध्ये जाणवणारी उष्णता यंदा मार्च-एप्रिल मध्येच जाणवू लागली आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या शरीराची लाही लाही होत आहे. उष्माघाताने मृत्यू होण्याची शक्यता असते. पालघर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी एका सोळा वर्षीय मुलीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने विशेष काळजी घेण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या उष्माघाताच्या रुग्णांसाठी एक विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम तैनात केली आहे. एखादा उष्मघाताचा रुग्ण आला तर त्याच्यावर लवकरात लवकर उपचार करण्याच्या अनुषंगाने हा कक्ष तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली. मात्र सुदैवाने आतापर्यंत जिल्ह्यात उष्माघाताचा एकही रुग्ण आढळला नसून, उष्माघात रुग्णांची संख्या वाढल्यास त्याप्रमाणे खाटा वाढवण्यात येतील असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शैलेश पवार म्हणाले.

- Advertisement -

उष्मा आणखी वाढणार
हवामान विभागाकडून उष्णतेची लाट आणखी काही दिवस राहाणार असल्याचे सांगितले आहे. उकाडा वाढल्यामुळे थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था इत्यादी लक्षणे आढळतात.

अशी घ्या काळजी

  • दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळावे.
  • जास्तीत जास्त पाणी प्यावे.
  • हलके, पातळ सुती कपडे वापरावेत.
  • बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपीचा वापर करावा.
  • प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
  • तीव्र लक्षणे जाणवल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -