Sunday, April 28, 2024
घरमानिनीBeautyचेहरा उजळ दिसण्यासाठी बटाट्याचा 'या' 5 प्रकारे करा वापर

चेहरा उजळ दिसण्यासाठी बटाट्याचा ‘या’ 5 प्रकारे करा वापर

Subscribe

भारतात बटाटा सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांपैकी एक आहे. बटाटा हा भारत आणि अमेरिकेत सर्वाधिक खाल्ला जाणारा लोकप्रिय भाज्यांपैकी एक आहे. बटाट्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. त्यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने देखील शरीराला ताकद देतात. बटाट्यामध्ये अँटिऑक्सिडंट्सही आढळतात. बटाट्याचा वापर केवळ खाण्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठी देखील केला जातो.

सुंदर त्वचेसाठी बटाट्याचा असा करा वापर

Potato On Face: Skin Care Remedy For You - HealthKart

- Advertisement -
  • चेहऱ्यावरील काळे डाग

चेहऱ्यावर काळे डाग असल्यास बटाट्याचा वापर करावा. चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी बटाट्याचा रस काढून त्याने चेहऱ्यावर मसाज करावे आणि अर्ध्या तासाने चेहरा धुवून घ्यावा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यास मदत होईल.

  • डोळ्यांखालील काळी वर्तुळे

डोळ्याखालील काळी वर्तुळे सौंदर्यामध्ये बाधा आणतात. ही डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे दूर करण्यासाठी बटाट्याच्या चकत्या काढून डोळ्यावर ठेवाव्यात. यामुळे ही काळी वर्तुळे कमी होतात.

- Advertisement -
  • चेहऱ्यावरील सुरकुत्या

काही तरुण-तरुणींच्या चेहऱ्यावर वयस्कर व्यक्तीसारख्या सुरकुत्या दिसतात. त्या दूर करण्यासाठी बटाट्याच्या रसात कापूस बुडवून तो कापूस फ्रिजमध्ये ठेऊन तो चेहऱ्यावर फिरवावा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

  • ब्लीच

बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करुन चेहऱ्यावर लावावा आणि हलक्या हाताने मसाज करावे. यामुळे नैसर्गिकरित्या ब्लीच होऊन चेहरा उजळ दिसतो.

  • चेहरा स्वच्छ होतो

बटाट्याचा एक चमचा रस, दोन चमचे लिंबू रस आणि दोन चमचे मुलतानी माती एकत्र करुन हा तयार फेसपॅक चेहऱ्याला लावावा. यामुळे चेहरा स्वच्छ होतो. तसेच चेहरा उजळण्यास मदत होते.

 


हेही वाचा :

उन्हामुळे ओठांचे नुकसान होत असेल तर ‘या’ टीप्स वापरा

 

- Advertisment -

Manini