घरमहाराष्ट्रराज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 1 रुपयाची मदत नाही - आदित्य ठाकरे

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 1 रुपयाची मदत नाही – आदित्य ठाकरे

Subscribe

नाशिक : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अजून 1 रुपयाची देखील मदत देण्यात आलेली नाही, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे. मंत्रिमंडळात फक्त घोषणा होतील. पण त्यांची अंबलबजावणी होणार नाही. मुख्यमंत्र एकनाथ शिंदे हे खासगी कामासाठी हॅलिकोप्टर वापरता यामुद्यांवर आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे हे नाशिकच्या दुष्काळी दौऱ्यावर आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, “पिकाचे जे नुकसान व्हायचे होते. ते पूर्णपणे झालेले आहे. परिस्थिती अशी आहे की, मागच्या वर्षी ओला दुष्काळ आणि यंदा देखील दुष्काळ परिस्थिती आहे. या दोन्ही वर्षात शेतकरी हतबल झालेले आहेत. आपल्या अन्नदात्याच्या मदतीला कोणी पुढे येत नाहीत. मुळात म्हणजे राज्य सरकारने जी मदत द्यायला पाहिजे. ती एक रुपयाची मदत सुद्धा राज्य सरकारने दिलेली नाही. मी काल पाहिले की, अनेक शेतकऱ्याना लिफाफे आणि नोटीसा आलेल्या आहेत. मग त्या, बँक किंवा कोण कर्ज दिले असेल, त्याची असेल की, जे कर्ज दिलेले आहे त्याची परत फेड करा. या सर्व कायदेशीर नोटीस असतील. तरी शेतकऱ्यांना शेतातून अजूनही एक रुपया देखील आलेला नसल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. आता शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या मदतीची गरज आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – खर्चाचा वाद : पंचतारांकित मंत्रिमंडळाच्या बैठकीला इंडिया आघाडीचे प्रत्युत्तर

ई-केवायसीमुळे फॉर्म भरण्यात अडचणी

“मागच्या वर्षी चार हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा झाली होती. त्याचा अजून एक रुपयाही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. आता तर पंचनामे देखील झालेले नाही. मुळात पंचायत अशी आहे की, ई-केवायसी ही जी गोष्ट आलेली आहे. फोनवर फोटो काढायचा अपोलड करायचा फॉर्म भरायचा वैगेरे, हे सर्व करण्यात शेतकऱ्यांचा वेळ लागत आहे. काही ठिकाणी नेटवर्क नाही. यात शेताचे नुकास अजून होत चालेले आहे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अपेक्षा काय आहे, या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, “या मंत्रिमंडळाकडून अपेक्षा तर नाहीच आहे. कारण आपण पाहिजे असेल. गेल्या एका वर्षा एकामेकांसाठी खूप भांडत आहेत. मंत्री पद, कोणाला कोणते खाते मिळणा, मंत्रिमंडळाचा विस्तार होणार की नाही आणि पालकमंत्री होणार, यावरून वाद सुरू आहे. मुळात शेतकरी, महिलांवर वाढत चालेले अत्याचार, राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहेत. यासंदर्भात राज्याचे मंत्रिमंडळ काही बोलत नाही. राज्य सरकारकडून खोटी आश्वासने खूप मिळत आहेत. आजही 50 हजार कोटी, 60 हजार कोटी या घोषणा होतील. घोषणा या घोषणाच राहत आहेत. पण त्याची अंबलबजावणी कुठे होत नाहीत.”

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी ‘या’ कारणामुळे फाइव्ह स्टार हॉटेलमधील मुक्काम शासकीय विश्रामगृहात हलवला

खासगी कामासाठी विमानाचा वापर

मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेलनंतर विश्रामगृहावर गेले, यासंदर्भात आदित्य ठाकरे म्हणाले, “आमचे मुख्यमंत्री स्वत:च्या शेतात दोन हॅलिकोप्टर घेऊन जातात. आता या मुख्यमंत्र्यांबद्दल काय बोलायचे. तुमचा हॉटेलवर खर्च होत असेल, हे देखील मान्य करायला तयार आहे. पण हे सर्व करून जनतेला फायदा काय? हा मुळात प्रश्न आहे. आज पण आपण पाहिले, मुख्यमंत्र्यांचे विमान वापरण्याचे नियम बदलले गेले आहेत. यापूर्वी जनतेच्या कामासाठी विमान वापरली जात होती. पण आता घरच्या कामांसाठी देखील वापरू शकतो. जनतेचा पैसा आहे. तरी देखील हे सर्व सुरू आहे. हे दुर्दैवी आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -