Thursday, May 2, 2024
घरमानिनीReligiousविवाहित महिलांनी दुसऱ्यांसोबत शेअर करु नये 'या' 5 वस्तू

विवाहित महिलांनी दुसऱ्यांसोबत शेअर करु नये ‘या’ 5 वस्तू

Subscribe

आपल्या आसपासच्या चांगला-वाईट गोष्टींचा आपल्या आयुष्यावर खूप जास्त परिणाम होतो. अनेकदा काहीजण आपल्या नियमित वापरातल्या गोष्टी दुसऱ्यांना सहज देतात. मात्र, शास्त्रानुसार काही गोष्टी आपण दुसऱ्यांकडून मागून वापरल्यास किंवा आपल्या वस्तू इतरांना वापरण्यासाठी दिल्यास त्याचा देणाऱ्या आणि घेणाऱ्या या दोघांवर नकारात्मक परिणाम होतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठं नुकसान देऊ शकतात. असं म्हणतात की, विवाहित महिलांनी अशाप्रकारची देवाण-घेवाण कधीही करु नये. नाहीतर त्याचा वाईट परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावर होतो.

विवाहित महिलांनी कधीही दुसऱ्यांना शेअर नये ‘या’ वस्तू

  • कुंकू

Round Skin Friendly Natural And Hygienic Red Kumkum Roil Powder Used In Multipurpose at Best Price in Noida | Gouri Cosmetic Center

- Advertisement -

असं म्हणतात की, विवाहित महिलांनी एखाद्या विवाहित महिलेला कुंकू भेट म्हणून दिल्यास तिचे सौभाग्य वाढते. मात्र, दररोज वापरत असलेले कुंकू विवाहित महिलांनी कधीही कोणाला देऊ नये. यामुळे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात.

  • मंगळसूत्र

The Ultimate Guide to Mangalsutra Designs in 2023 - Mintly

- Advertisement -

मंगळसूत्र हा सौभाग्य अलंकार आहे. अनेकदा महिलांना दुसऱ्यांचे दागिने वापरायला फार आवडतात. अशावेळी काही महिला एकमेकींचे मंगळसूत्र देखील घालून पाहतात. यामुळे वैवाहिक जीवनावर वाईट प्रभाव पडतो.

  • काजळ

Know The Process To Make Herbal Kajal At Home | महंगे काजल पर पैसे खर्च करने से अच्छा है आप घर पर ही बनाएं हर्बल काजल...ये है तरीका

विवाहित महिलांनी आपली सर्व श्रुंगार सामग्री स्वतः वापरावी. कुंकू आणि मंगळसूत्राप्रमाणेच काजळ देखील दुसऱ्यांसोबत शेअर करु नये. यामुळे पति-पत्नीमध्ये वाद-विवाद होतात.

  • पैंजण-जोडवी

घर पर चमकाएं पायल-बिछिया

विवाहित महिलांनी आपली पैंजण-जोडवी देखील दुसऱ्या कोणासोबत शेअर करु नये. यामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

  • चूडा (बांगड्या)

hirva chuda

विवाहित महिलांनी वापरत असलेला चूडा देखील कोणासोबत शेअर करु नये. हे तुमच्या नात्यासाठी घातक ठरू शकतं.


हेही वाचा :

Vastu Tips : भिंतीवर पिंपळाचं झाड उगवलं तर दुर्लक्ष करू नका

- Advertisment -

Manini