Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Tiffin recipes- झटपट बनवा टीफीन रेसिपी

Tiffin recipes- झटपट बनवा टीफीन रेसिपी

Subscribe

मुलं टिफीनमध्ये नेहमी भाजी पोळी, पोहे, उपमा ,ब्रेड बटर , जाम ब्रेड नेण्यास कंटाळतात

मुलांना रोज टिफीनमध्ये काय द्यायचं हा प्रश्न प्रत्येक आईला पडतो. कारण मुलं टिफीनमध्ये नेहमी भाजी पोळी, पोहे, उपमा ,ब्रेड बटर , जाम ब्रेड नेण्यास कंटाळतात. यामुळे बऱ्याचवेळा टिफीन पूर्ण न संपवता अर्धवट उरलेला घेऊन घरी येतात. अशावेळी कल्पकता वापरून नवीन पदार्थ तुम्ही सहज बनवू शकता.

- Advertisement -

 

शेवयांचा उपमा

- Advertisement -

साहीत्य- तांदळाच्या किंवा गव्हाच्या शेवया एक पॅकेट (२०० ग्रॅ) पाव वाटी बारीक चिरलेला कांदा, पाव वाटी बारीक चिरलेला टॉमेटो, दोन टेबल स्पून सिमला मिरची, पाव वाटी वाटाणे, दोन टेबल स्पून फरसबी, दोन टेबल स्पून गाजर,
दोन टेबल स्पून कोथिंबीर, एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची,
चवीनुसार मीठ, जिरे, मोहरी

कृती- सर्वप्रथम एका छोट्या कढईत दोन ते तीन कप पाणी गरम करायला ठेवा. नंतर त्यात शेवया मोडून टाका.त्यावर एक चमचा तेल टाका. शेवया सुटसुटीत होतील. नंतर पाण्यातून शेवया काढा. चाळणीत ठेवा. शेवया कोरडया होतील.

यादरम्यान गॅसवर दुसऱ्या कढईत तेल घ्या.तेल गरम झाले की त्यात जिरे मोहरी, कांदा, टॉमेटो आणि हिरवी मिरची टाकून परतून घ्या.त्यात भाज्याही परतून घ्या. नंतर त्यात शेवया टाका. मीठ टाका.गरमागरम शेवया उपमा तयार.वरून कोथिंबीर घाला.

पोह्याचा डोसा

साहित्य-तांदूळ 1 कप,पोहे अर्धी वाटी,दही अर्धा कप उडीद डाळ 2 चमचे,मेथी दाणे १ टीस्पून, साखर 1/2 टीस्पून
आवश्यकतेनुसार तेल, पाणी. चवीनुसार मीठ

कृती- डोसा बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात तांदूळ,उडीद डाळ, मेथीचे दाणे एकत्र पाण्यात भिजत घाला.यानंतर दुसऱ्या भांड्यात पोहे धुवून घ्या आणि दीड कप पाण्यात 5 तास भिजत ठेवा. नंतर सर्व पदार्थ मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या. त्यात दही आणि थोडे पाणी घालून पीठ बनवा.गरज असल्यास थोडे पाणी टाका. मीठ घालून मिक्स करा.10-12 तास हे मिश्रण राहू द्या. डोसा बनवण्यासाठी मंद आचेवर तवा गरम करा. तव्याला थोडे तेल लावा.
तव्यावर मिश्रण पसरवून त्याचे डोसे काढा. हिरव्या चटणीबरोबर हा डोसा टेस्टी लागतो.

 

 

 

- Advertisment -

Manini