मोमोज हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडतो. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बटाट्याचे मोमोज बनवू शकता. मोमोज हा प्रकार मैदाच्या पिठापासून बनवला जातो. तसेच मोमोज हा प्रकार व्हेज आणि नॉन व्हेज या दोन्ही मिश्रणाने बनवला जातो. तसेच हा एक चविष्ट पदार्थ असून कधी तरी वेगळी टेस्ट येण्यासाठी हा पदार्थ नक्की ट्राय करा.
साहित्य-
- 2 कप मैदा
- 1/2 टीस्पून मीठ
- 1/2 टीस्पून बेकिंग पावडर
- 5 उकडलेले बटाटे
- लसूनची पेस्ट
- 1 टीस्पून बटर
- 2 टीस्पून काळी मिरी
- चवीनुसार मीठ
कृती-
- मैदा, मीठ आणि बेकिंग पावडर एकत्र करा आणि पाण्याने घट्ट पीठ मळून घ्या.
- उकडलेले बटाटे, लसूण पेस्ट, मिरपूड आणि मीठ एकत्र मॅश करा. या सर्वांचे मिश्रण तयार करा.
- पीठ पातळ लाटून त्याचे 4″-5″ गोल करून लहान चकत्या लाटून घ्या.
- या चकत्या मध्ये हे मिश्रण भरून घ्या.
- यानंतर तयार मोमोज 10 मिनिटे वाफवून घ्या.
- आता खाण्यासाठी मोमोज तयार.
- यासोबत सोया सॉस आणि मिरची सॉस सर्व्ह करा.
हेही वाचा :
Amla Chutney : घरी बनवा झटपट आरोग्यदायी आवळ्याची चटणी
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -