Friday, April 26, 2024
घरमानिनीAmla Chutney : घरी बनवा झटपट आरोग्यदायी आवळ्याची चटणी

Amla Chutney : घरी बनवा झटपट आरोग्यदायी आवळ्याची चटणी

Subscribe

अनेक आजारांवर आवळा एक रामबाण उपाय आहे. यामुळे आठवड्यातून एकदा तरी जेवणात आवळ्याच्या चटणीचा समावेश करावा.

कोणत्याही प्रकारची चटणी म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटत. अशातच आवळ्याची चटणी ही प्रमुख चटणी पैकी एक आहे. आवळा हा आरोग्याच्या आश्चर्यकारक फायद्यांसाठी ओळखला जातो. आवळ्याचा उपयोग अनेक शतकांपासून रोग बरे करण्यासाठी केला जात आहे. व्हिटॅमिन सी समृद्ध आवळा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तसेच तुम्ही आहारात आवळ्याचा अनेक पद्धतीने समावेश करू शकता.

Amla Chutney: Make this spicy and healthy gooseberry chutney at home. Amla Chutney : Make this spicy and healthy Amla Chutney at home | PiPa News

- Advertisement -

चला जाणून घेऊया आवळ्या चटणीची खास रेसिपी-

साहित्य-

- Advertisement -
  • आवळा – 1/2 किलो
  • चिरलेली कोथिंबीर – 1 कप
  • चिरलेली हिरवी मिरची – 1 टीस्पून
  • आले – 1 इंच
  • जिरे – 1/2 टीस्पून
  • हिंग – 1/4 टीस्पून
  • काळे मीठ – 1/4 टीस्पून
  • चवीनुसार मीठ
  • साखर – 2 टीस्पून

Amla Chutney, How to make Easy Indian Gooseberry Chutney - Vaya.in

कृती-

  • सर्व प्रथम आवळे घ्या आणि मोठं-मोठे त्याचे काप कापून घ्या.
  • कोथिंबीर धुवून बारीक करून घ्या.
  • हिरवी मिरची आणि आले कापून बाजूला ठेवा.
  • ब्लेंडरमध्ये आवळा, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले, जिरे, हिंग, काळे मीठ, मीठ आणि साखर घाला.
  • मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून चांगली पेस्ट तयार करा.
  • हवाबंद डब्यात साठवा आणि रेफ्रिजरेट करा.

हेही वाचा :

Kairi Chutney: तिखट गोड कैरीची चटणी,जाणून घ्या साहित्य आणि कृती

- Advertisment -

Manini