Friday, May 10, 2024
घरमानिनीHealthयुरिनचा रंग जर असा दिसत असेल तर व्हा सावध

युरिनचा रंग जर असा दिसत असेल तर व्हा सावध

Subscribe

युरिनरी ट्रॅक्ट इंन्फेक्शन ही एक सामान्य समस्या आहे. जी पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक असते. हा आजार अशावेळी होतो जेव्हा बॅक्टेरिया हे आपल्या युरिनरीच्या क्रियेला संक्रमित करतात. याचा परिणाम किडनी, ब्लॅडर आणि त्यांना जोडणाऱ्या नलिकांवर पडतो. वेळीच यावर उपचार न केल्यास गंभीर समस्येचा सामना करावा लागू शकतो.

युटीआय मुख्य रुपात ई-कोलाई बॅक्टेरियामुळे होते. हे बॅक्टेरिया मुत्रमार्गाच्या येथून ब्लॅडर पर्यंत पोहचते. अशातच हाइजिनची काळजी न घेणे, डिहाइड्रेशन आणि कमी पाणी पिणे, मधुमेह, प्रेग्नंसी आणि किडनी स्टोन ही युटीआयची मुख्य कारणे आहेत.

- Advertisement -

युरिन करताना खुप जळजळ होणे, वारंवार लघवी होणे, लघवीतून रक्त येणे, लघवीचा रंग फिकट होणे, लघवीला दुर्गंधी येणे आणि महिलांमध्ये पेल्विसमध्ये दुखणे ही युटीआयचे संकेत आहेत. त्याचसोबत पोटाच्या साइडला दुखणे, थंडी वाजणे, खुप ताप येणे आणि उलटी करण्याचे मन होणे ही त्याची काही लक्षणे आहेत.

Toward True Health: What is in the color of urine?

- Advertisement -

खरंतर सेक्शुअली अॅक्टिव्ह महिलांमध्ये या इंन्फेक्शनचा धोका अधिक असतो. या व्यतिरिक्त कमी पाणी पिणे, दिवसातून एकदा अंघोळ करणे, खुप वेळ युरिन रोखून धरणे आणि किडनी स्टोन असणाऱ्यांमध्ये हे इंन्फेक्शन लवकर होते. युरिन टेस्टच्या माध्यमातून युटीआय बद्दल अधिक माहिती मिळू शकते.

उपचार काय?
काही युटीआय तुम्ही उपचाराशिवाय ठीक होतात. तर काही गंभीर इंन्फेक्शनवर उपचार अँन्टीबायोटिक औषधांच्या माध्यमातून केले जाते. या व्यतिरिक्त डॉक्टर तुम्हाला खुप द्रव पदार्थ घेण्यास आणि ब्लेडरमधून बॅक्टेरिया बाहेर काढण्यासाठी लवकरात लवकर बाथरूमला जाण्याचा सल्ला देऊ शकतात.

कसे दूर रहाल?
युटीआय इंन्फेक्शन पासून दूर राहण्यासाठी खुप पाणी प्या. सेक्स पूर्वी आणि नंतर टॉयलेटला जरूर जा. प्रायव्हेट पार्ट स्वच्छ धुवा. या व्यतिरिक्त लघवी दीर्घकाळ रोखून ठेवू नका. गर्भवती महिला, वृद्ध आणि मधुमेहाच्या रुग्णांनी युटीआयच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.


हेही वाचा- किडनीला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स

- Advertisment -

Manini