घरमनोरंजनजाहिरातीत झळकली शाहरुखची लेक; पाहा पहिली झलक

जाहिरातीत झळकली शाहरुखची लेक; पाहा पहिली झलक

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. मात्र, यापूर्वीच सुहानाला मोठ्या ब्रँडसोबत काम करण्याची संधी मिळाली याबाबात नुकत्याच काही दिवसांपूर्ली घोषणा देखील झाली होती. ज्यात सुहानाला खानला प्रसिद्ध न्यूयॉर्कस्थित ब्यूटी ब्रँड मेबेलिन (Maybelline) ची ब्रँड अम्बेसिटर बनवण्यात आलं. दरम्यान, आता या ब्यूटी ब्रँडमध्ये सुहानाने काम केलेली पहिली जाहिरात समोर आली आहे. सुहानाने ही जाहिरात तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. सुहानाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

सुहानाने या जाहिरातीचा व्हिडिओ शेअर करत खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “मेबेलिन न्यूयॉर्कचा नवा चेहरा बनण्यासाठी आणि या सुंदर महिलांसोबत या खास क्षणाला शेअर करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.” सुहानाच्या या व्हिडिओवर अनेक दिग्गज कलाकार प्रतिक्रिया देत आहे. अनेकजण तिचं कौतुक करत आहेत.

- Advertisement -

गौरी खानची प्रतिक्रिया चर्चेत

सुहानाने शेअर केलेल्या या पोस्टवर गौरी खान, अमिताभ बच्चन श्वेता बच्चन आणि शनाया कपूर असे अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. मात्र, गौरी खान म्हणजेच सुहानाच्या आईच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. गौरी खानने सुहानाच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत लिहिलंय की, “मला आता हा मस्कारा हवा आहे.” यावर अनेक नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

- Advertisement -

हेही वाचा :

समंथाच्या ‘शाकुंतलम’ चित्रपटाने कमावले केवळ ‘इतके’ कोटी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -