Thursday, May 9, 2024
घरमानिनीHealthतुमची अपूर्ण झोप वाढवू शकतो लठ्ठपणा

तुमची अपूर्ण झोप वाढवू शकतो लठ्ठपणा

Subscribe

आजकालच्या धावपळीच्या काळात अनियमीत आहार, व्यायामाचा अभाव या समस्यांचा अनेकांना सामना करावा लागतो. वजन वाढण्यामागे ही मुख्य कारणं समजली जातात. पण अमेरिकेतल्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात अपूर्ण झोप हे देखील वजन वाढण्याचे एक कारण असू शकते, असे आढळून आले आहे.

अपूर्ण झोपेमुळे वाढू शकतो लठ्ठपणा

Obese people too can keep those lost kilos off | Health News | Zee News

- Advertisement -

हेल्थ एक्सपर्टे्सच्या मते, दिवसातून कमीत-कमी 7 तास तरी झोप घेणं गरजेचं आहे. परंतु कामाच्या धावपळीमुळे लोकांना झोप कमी मिळते. ती पूर्ण होण्याच्या आतच अर्धवट झोपेच उठून पुन्हा कामासाठी जावं लागतं. अशावेळी अर्धवट झोपेमुळे आलेला आळस घालवण्यासाठी काहीजण चहा किंवा कॉफी घेतात. मात्र, अर्धवट झोपेत अशा प्रकारची उत्तेजक पेये घेणं आणि झोप न झालेल्या शरीराला तसेच कामाला लावणं यामुळे सुद्धा अनेकांचे वजन वाढू शकते.

झोपेच्या वेळा, झोपेचा पॅटर्न बदलला की, मेंदूमध्ये होणार्‍या प्रक्रिया विचलित होतात. पुरेशी झोप न घेतल्यास शरीरामध्ये घेरलीन नावाचे हार्मोन तयार होण्याची प्रक्रिया सुद्धा विस्कळीत होते. अनियमित आणि अपुर्‍या झोपेचे इतरही अनेक परिणाम शरीरावर होतात. झोप अपूर्ण झाल्यास तिच्यात शरीराच्या चयापचय क्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यातून मधुमेहासारखे आजार देखील होऊ शकतो. ज्यामुळे हळूहळ लठ्ठपणा देखील वाढतो.

- Advertisement -

 


हेही वाचा :

बद्धकोष्ठतेची समस्या ‘या’ आयुर्वेदिक चुर्णाने होईल दूर

- Advertisment -

Manini