घरमहाराष्ट्रभुजबळांसहित सदावर्तेंनाही सुनावलं; उपमुख्यमंत्र्यांनी अशी येडपटं पाळलीच कशी? जरांगेंचा सवाल

भुजबळांसहित सदावर्तेंनाही सुनावलं; उपमुख्यमंत्र्यांनी अशी येडपटं पाळलीच कशी? जरांगेंचा सवाल

Subscribe

100 एकर जमिनीवर या भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी 7 कोटी जरांगे पाटलांकडे कुठून आले, असा सवाल उपस्थित केला होता. यावर आता जरांगे पाटील यांनी भुजबळांचा एकेरी उल्लेख करत टीकास्त्र डागलं आहे.

जालना: जालनातल्या अंतरवाली सराटी या गावात मराठ्यांची मोठी सभा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात घेतली जात आहे. 100 एकर जमिनीवर या भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी 7 कोटी जरांगे पाटलांकडे कुठून आले, असा सवाल उपस्थित केला होता. यावर आता जरांगे पाटील यांनी भुजबळांचा एकेरी उल्लेख करत टीकास्त्र डागलं आहे. (Gunratne Sadavarte along with Chhagan Bhujbal also recited How did the Deputy Chief Minister Ajit pawar and Devendra Fadnavis follow such a Idiot Manoj Jarange s question)

जरांगे पाटील म्हणाले की, एक येडपट म्हणालं 7 कोटींना सभेसाठी वावर घेतला. त्याला म्हणावं 100 एकर वावर काय विकत घेतला नाही, भाड्यानं घेतलाय सभेसाठी. काही शेतकऱ्यांनी तर फुकट दिलायं हवं तर येऊन विचार, असं आव्हानं देखील यावेळी जरांगेंनी भुजबळांना दिलं. तसंच, गाड्या मराठ्यांनी स्वत:च्या पैशाने आणल्यात आणि तो (भुजबळ) म्हणतो कोणी 10 रुपये पण देत नाही. तुम्हाला देत नसतील आम्हाला देतात, अशा शब्दांत त्यांनी भुजबळांना सुनावलं.

- Advertisement -

ज्या गोरगरिब मराठ्यानं तुला मोठं केलं त्याचंच रक्त पिऊन तू पैसा कमवला म्हणून तुझ्यावर धाडी पडल्या. गोरगरिब लोकांचे पैसे खाल्ले आणि दोन वर्षे बेसन खाऊन आला आतून, असं म्हणत जरांगे पाटलांनी भुजबळांना तुरुंगवासाची आठवण करून दिली. तसंच भुजबळ आता पुन्हा तुरुंगात जायच्या तयारीत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

123 गावांनी निधी गोळा केला

जरांगे पाटील म्हणाले की, या सभेसाठी आम्ही घामाचा पैसा लावला आहे. जवळपासच्या गोदा पट्ट्यातील 123 गावांतून हा निधी जमा केला गेला. तसंच, महाराष्ट्रातून या सभेसाठी येणाऱ्या या मराठ्यांची सेवा करण्याचं काम 123 गावांनी केला आहे.  त्यातही 123 मधून 22 गावांनी पैसे दिले तेच 21 लाख झाले, म्हणून इतर गावांकडून पैसे घेतलेच नाहीत, असं म्हणत जरांगे पाटलांनी संपूर्ण हिशोब दिला.

- Advertisement -

अजितदादा यांना समज द्या, नाहीतर…

भुजबळांना वावर घेण्याचं वेड लागलं आहे. लोकांचे पैसे खाण्याची सवय त्यांना आहे. आम्ही 7 कोटी खर्च केले, असं ते ( भुजबळ) म्हणतंय. एवढ्या मोठ्या नेत्यानं असं वक्तव्य करणं अपेक्षित नाही. त्यामुळे अजितदादा त्यांना समज द्या, तुमच्या पक्षातील नेते आहेत ते. नाहीतर मी असा मागे लागेन. त्याला म्हणावं माझ्या नादाला लागू नको, मी कोणाच्या मागे लागलो तर त्याला सोडतच नाही, अशा शब्दांत त्यांनी भुजबळांना सुनावलं.

उपमुख्यमंत्र्यांनी अशी येडपटं पाळलीच कशाला 

मनोज जरांगे पाटलांना तातडीने अटक करण्याची मागणी वकील गुणरत्ने सदावर्ते यांनी केली होती. यावरही जरांगे पाटलांनी भाष्य केलं आहे. जरांगे पाटील म्हणाले की, काल मधेच ते एक टरमळं उठलं, ते काहीतरी वेगळंच म्हणतंय. तो पण उपमुख्यमंत्र्यांचाच कार्यकर्ता आहे असं म्हणतात लोकं. असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. तसंच, अशा येडपटांना उपमुख्यमंत्र्यांनी पाळलंच कसं असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

(हेही वाचा: मराठा समाजाला आरक्षण हवं, ते दिलं नाही तर… जरांगेंचा एल्गार; फक्त 10 दिवस… )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -