घरमहाराष्ट्रमराठा समाजाला आरक्षण हवं, ते दिलं नाही तर... जरांगेंचा एल्गार; फक्त 10...

मराठा समाजाला आरक्षण हवं, ते दिलं नाही तर… जरांगेंचा एल्गार; फक्त 10 दिवस…

Subscribe

मराठा समाजासाठी आज सुवर्ण क्षण आहे. आणखीन फक्त 10 दिवस. आम्ही तुम्हाला दिलेले 40 दिवस संपत आलेत. त्यामुळे जर मराठा बांधवांना आरक्षण दिलं नाही तर 40 व्या दिवशी समजेल मराठा काय आहे तो, अशा भाषेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. 

जालना: मराठा समाजासाठी आज सुवर्ण क्षण आहे. आणखीन फक्त 10 दिवस. आम्ही तुम्हाला दिलेले 40 दिवस संपत आलेत. त्यामुळे जर मराठा बांधवांना आरक्षण दिलं नाही तर 40 व्या दिवशी समजेल मराठा काय आहे तो. तसंच, 22 ऑक्टोबरला मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आणि त्यानंतर जे होईल त्याला सरकार जबाबदार राहील, अशा भाषेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.  (Maratha community wants reservation if it is not given Jarangancha Elgar Only 10 days left Jalna Aantarwali Sarate )

जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी उपस्थित आहे. 100 एकराच्या मैदानात मनोज जरांगेंची सभा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी काल रात्रीपासूनच मराठा आंदोलकांनी हजेरी लावली होती. यावर जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाज एक होत नाही असं कोण म्हणालं. जे असं म्हणतात त्यांना ही गर्दी दाखवा. असं म्हणत जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या जमलेल्या जमावाला सांगितल्या.

- Advertisement -

जरांगे पाटलांच्या प्रमुख मागण्या

  • सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा .
  • कोपर्डीच्या बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी
  • मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांना सांगितलेला निधी, सरकारी नोकरी द्यावी
  • दर 10 वर्षाने आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करावा, आणि प्रगत जाती बाहेर काढाव्यात
  • PHD करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावावेत

मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आता मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं तरी चालेल: जरांगे पाटील

महाराष्ट्रातील मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आता मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग आरक्षण दिलं तरी चालेल. पण, इतर प्रवर्गांप्रमाणे हा प्रवर्गल टिकला पाहिजे, तरच हे आरक्षण आम्ही घेणार, 50 टक्क्यांच्या वर आम्ही आरक्षण घेणार नाही, असं जरांगे पाटलांनी ठणकावून सांगितलं.

- Advertisement -

(हेही वाचा: MLA Disqualification Case : ‘घटनाबाह्य सरकारला विधानसभा अध्यक्षांचं संरक्षण’; राऊतांचा नार्वेकरांवर घणाघात )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -