Saturday, September 30, 2023
घर मानिनी Health अचानक वजन कमी होणे, असू शकतात 'या' आजाराचे लक्षण

अचानक वजन कमी होणे, असू शकतात ‘या’ आजाराचे लक्षण

Subscribe

लठ्ठपणामुळे आजच्या काळात प्रत्येकजण चिंतेत असतो. अशातच अचानक तुमचे वजन कमी होत असेल तर आनंदित होण्याऐवजी त्याकडे लक्ष द्या. कारण हे एखाद्या आजाराचे सुद्धा लक्षणं असू शकते. या बद्दल एक्सपर्ट्स काय म्हणतात हे पाहूयात.

कोणत्या आजारांमुळे वजन होते कमी?

- Advertisement -

मधुमेह
एक्सपर्ट्सच्या मते मधुमेहाचा आजार झाल्यास तर वजन वेगाने कमी होई लागते. मधुमेह लाइफस्टाइल संबंधित एक समस्या आहे. यामध्ये इंसुलिन तयार होणे किंवा कमी होण्याच्या कारणास्तव शरिरात असलेले सेल्स ग्लुकोज घेऊ शकत नाहीत आणि एनर्जी कमी होते. एनर्जीसाठी शरीर वेगाने फॅट बर्न करते. अशातट तुमचे वजन अचानक कमी होते.

थायरॉइड
थायरॉइडच्या कारणास्तव ही तुमचे वजन कमी होऊ शकते. याचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे हायपोथायरायडिज्म आणि दुसरा म्हणजे हाइपरथायराडिज्म. हाइपरथायराडिज्ममध्ये ग्लँन्ड गरजेपेक्षा अधिक अॅक्टिव्ह होते. त्यामुळे शरीराचे वजन अचानक कमी होऊ लागते.

- Advertisement -

डिप्रेशन
वजन कमी होण्याचे आणखी एक मोठे कारण म्हणजे डिप्रेशन. डिप्रेशन एक प्रकारचा मूड डिसऑर्डर आहे. ज्यामध्ये चिंता, तणाव, राग, चिडचिडेपणा वाटत राहते. डिप्रेशनमध्ये काही लोक खुप खातात. तर काहींना काहीच न खाण्याची इच्छा होते. यामुळे ही वजन कमी होऊ शकते.

टीबी
ट्युबरक्लोसिस ज्यााल आपण सामान्य भाषेत टीबी असे बोलतो. हा आजार झाल्यास वजन वेगाने कमी होऊ लागते. त्यामध्ये व्यक्तीचे फुफ्फुसं प्रभावित होतात. वजन कमी होणे, भूक कमी लागणे ही टीबीची प्रमुख लक्षणे आहेत.

कॅन्सर
कॅन्सरच्या कारणास्तव वजन वेगाने होऊ लागते. हा कोणत्याही प्रकारचा कॅन्सर असू शकतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती यामुळे कमी होते आणि कोणत्याही आजारापासून लढण्यास आपण सक्षम राहत नाही.


हेही वाचा- लहान लहान गोष्टी विसरता, मग असू शकते ‘या’ व्हिटॅमिनची कमतरता

- Advertisment -

Manini