Tuesday, May 14, 2024
घरमानिनीHealthवजन वाढतंय? मग या ड्राय फ्रूटने करा कमी

वजन वाढतंय? मग या ड्राय फ्रूटने करा कमी

Subscribe

आजकाल सर्वजण आपल्या आरोग्याबद्दल खुप जागरुक राहू लागले आहेत. हेल्थ संबंधित समस्यांपासून दूर राहण्यासाठी वजन नियंत्रित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुमचे वजन वाढले असेल तर काही आजारांचा सामना करावा लागू शकतो. सध्या लठ्ठपणा ही सध्याची समस्या झाली आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी डाएट योग्य असणे सर्वात गरजेचे असते. मात्र तसे नसेल तर वजन कमी करणे मुश्किल होते. खासकरुन अशा लोकांसाठी जी लोक सतत स्नॅक खातात. त्यांचे वजन कमी होत नाही. पुढील काही ड्राय फ्रुट्सने तुम्ही वजन कमी करू शकता. (Weight loss tips)

बदाम
वजन कमी करण्यासाठी भिजलेले बदाम खाऊ शकता. बदामात ओमेगा-3 फॅटी अॅसिड, मॅग्नेशिअम, लोह, व्हिटॅमिन-के, व्हिटॅमिन-ई, प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, कॉपर आणि जिंक असते. यामुळे डाइजेशन सुधारले जाते आणि वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे शरीराला उर्जा मिळते. पोट भरलेले राहते. काही अनहेल्दी खाण्याचे मन ही होत नाही.

- Advertisement -

मनुके
मनुके आरोग्यासाठी हेल्दी मानले जाते. महिलांना जर पीरियड्स संबंधित समस्या असतील तर हे फायदेशीर ठरेल. यामध्ये सोडिअमचे प्रमाण कमी असते. दररोज मनुके खाल्ल्याने आणि त्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी होऊ शकते. त्याचसोबत पचनक्रिया सुरळीत होते. यामुळे शरीराला लोहची पुर्तता होते.

आक्रोड
आक्रोडमध्ये हेल्दी फॅट्स असततात, जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि फायबर असतात. बहुतांश लोकांना असे वाटते की, आक्रोडचे सेवन केल्याने वजन वाढले जाते. मात्र असे होत नाही. आक्रोडमुळे वजन नियंत्रणात राहू शकते. भिजलेले आक्रोडचे तुम्ही सेवन करू शकता. यामुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होते.

- Advertisement -

खजूर
खजूर मध्ये सेलेनियम, मॅग्नीज, मॅग्नेशियम आणि लोहचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. ते खाल्ल्याने लगेच एनर्जी मिळू शकते. त्वचा उजळ होते. रात्री उत्तम झोप लागते आणि हाडं मजबूत होतात. यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. ते खाल्ल्याने पोट भरलेले राहते. दिवसातून दोन खजूर जरुर खावेत.

पिस्ता
जर तुम्हााल काही खाण्याची सवय असेल तर पिस्ता आणि मखाना सारख्या गोष्टी तुमच्या सोबत ठेवा. यामुळे पोट भरलेले राहते आणि दीर्घ काळापर्यंत काही खाण्याचे मन करत नाही. यामुळे वजन आणि बेली फॅट कमी करण्यास मदत होते.


हेही वाचा- डाएट न करता 21 दिवसात करा weight loss

- Advertisment -

Manini