Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन अर्जुन कपूरने बहिणींसोबत केले रक्षाबंधन; फोटो व्हायरल

अर्जुन कपूरने बहिणींसोबत केले रक्षाबंधन; फोटो व्हायरल

Subscribe

देशभरात 30 ऑगस्ट (काल) आणि 31 ऑगस्ट (आज) रोजी रक्षाबंधन साजरी केली जात आहे. प्रत्येकवर्षी प्रमाणे यावर्षी देखील बॉलिवूड कलाकारांनी रक्षाबंधन साजरी केली. अशातच, अभिनेता अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर राक्षाबंधन सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अर्जुनसोबत अंशुला कपूर, खुशी कपूर आणि शनाया कपूर देखील दिसत आहेत, मात्र यावेळी अभिनेत्री जान्हवी कपूर येथे उपस्थित नव्हती.

अर्जुन कपूरची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत अर्जुनने खालील कॅप्शनमध्ये लिहिलंय की, या कुळातील काही प्रमुख लोक गायब आहेत, ज्यांना सोडले गेले आहे.” अर्जुनच्या या पोस्टवर चाहते अनेक कमेंट्स करत आहेत. तसेच यामध्ये जान्हवी कुठे आहे असं देखील विचारत आहेत.

या चित्रपटांध्ये दिसणार अर्जुन

- Advertisement -

अर्जुन कपूर शेवटचा ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिसला होता. 2022 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात अर्जुन कपूरसोबत अभिनेता जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि दिशा पटानी यांच्याही मुख्य भूमिका होत्या. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. आगामी काळात त्याचे ‘द लेडी किलर’ आणि ‘मेरी पत्नी का रिमेक’ या चित्रपटांमध्ये तो दिसणार आहे.


हेही वाचा : राष्ट्रीय पुरस्कार विजेते अल्लू अर्जुन यांच्यासोबत ‘पुष्पा 2 द रुल’ सेटची पहिली झलक सादर केली

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -