Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthउन्हाळ्यात का करावे ज्वारीच्या भाकरीचे सेवन?

उन्हाळ्यात का करावे ज्वारीच्या भाकरीचे सेवन?

Subscribe

पूर्वीच्या काळी चपातीच्या तुलनेत भाकरीचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जायचे. भाकरीला सामान्यत: पोषक तत्त्वांचे पॉवरहाऊस म्हटले जाते. कारण ते शरीरासाठी फायदेशीर आहे. महाराष्ट्रात तांदूळ, ज्वारी, नाचणी, बाजरी या धान्यापासून भाकरी बनवतात. या सर्व प्रकारच्या भाकरी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. हिवाळ्यात शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून बाजरी, मका आणि नाचणीची भाकरी खाणं पसंत करतात. परंतु या धान्यांचे सेवन उन्हाळ्यात जास्त करु नये. कारण, या दिवसात शरीराला थंडाव्याची गरज असते. या दिवसात तुम्ही ज्वारी किंवा तांदळाच्या भाकरीचे सेवन करु शकता.

उन्हाळ्यात करा ज्वारीच्या भाकरीचे सेवन

What Is Millet and What Makes This Grain So Healthy?

- Advertisement -
  • शरीराला थंडावा हवा असल्याच ज्वारीचे सेवन उन्हाळ्यात आर्वजून करावे.
  • ज्वारीच्या भाकरीमध्ये मॅग्नेशियम , फॉस्फरस यांसारखे पोषक घटक असतात. ज्वारीची भाकरी लहानमुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर असते.
  • तसेच ज्वारीच्या भाकरीमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन बी या पोषक तत्त्वांचाही समावेश असतो. या भाकरीचे नियमित सेवन केल्यामुळे केस आणि त्वचा चांगली राहते.
  • ज्वारीच्या भाकरीत ओमेगा-3 फॅटी अॅसिडस, पोटॅशियम, फायबर ,आयरन यासारखे न्युट्रीएंट्रस असतात. या पीठाचा आहारात समावेश केल्यास बद्धकोष्ठ सारख्या समस्या दूर होतात.
  • सध्याच्या वाढत्या प्रदुषणामुळे आणि दगदगीच्या आयुष्यामुळे महिलांमध्ये मासिक पाळीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. या संदर्भातील समस्यांमुळे जेवणात ज्वारीचे सेवन खुप महत्वाचे ठरते. ज्वारी थंड गुणाची असल्याने अतिउष्णतेमुळे मासिक पाळीत होणारा त्रास कमी करण्यासाठी ज्वारी उपयोगी आहे.
  • ज्वारीत मुबलक प्रमाणात तंतुमय (फायबर) पदार्थ असतात, त्यामुळे त्याने पोट साफ होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना अम्लपित्तचा त्रास आहे त्यांनी चपातीच्या ऐवजी आहारात ज्वारीची भाकरीचा समावेश करावा. ज्वारीच्या सेवनाने मुळव्याधीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.

 


हेही वाचा :

आहारातील मिरचीचा वापर ठेवले अनेक आजारांपासून दूर

- Advertisment -

Manini