Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthआहारातील मिरचीचा वापर ठेवले अनेक आजारांपासून दूर

आहारातील मिरचीचा वापर ठेवले अनेक आजारांपासून दूर

Subscribe

भारतीय पदार्थांमध्ये असे काही मसाले आणि भाज्यांचा वापर केला जातो जे त्या पदार्थाची चव वाढवतात. हिरवी मिरची सुद्धा त्यापैकीच एक आहे. हिरव्या मिरचीचा वापर पदार्थाला तिखटपणा येण्यासाठी केला जातो. परंतु तुम्हाला माहितेय का, ही हिरवी मिरची सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

हिरवी मिरची खाण्याचे फायदे

10 Surprising Benefits of Eating Green Chilli

- Advertisement -
  • वजन कमी होण्यास फायदेशीर

हिरवी मिरची गरम असल्याने मेटाबॉलिज्म सुधारला जातो आणि कॅलरीज बर्न करून वेट मॅनेजमेंट होण्यास मदत होते.

  • कोलेस्ट्रॉलचा स्तर होतो कमी

हिरव्या मिरचीतील कॅप्साइसिन ब्लड प्रेशरला कमी करू शकते आणि कोलेस्ट्रॉलचा स्तर ही कमी करते. त्यामुळे संभाव्यरुपात हृदयासंबंधित धोका कमी होऊ शकतो.

- Advertisement -
  • कॅन्सरपासून बचाव

काही अभ्यासातून समोर आलंय की, मिरचीत आढळून येणाऱ्या कॅप्साइनिसनमध्ये अँन्टी कॅन्सर गुण असतात. जे कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करतात. परंतु याबद्दलचे अधिक संशोधन अद्याप सुरु आहे.

  • क्रॉनिक डिजीजचा धोका कमी होतो

हिरव्या मिरचीतील कॅप्साइसिन सारखे अँन्टीऑक्सिडेंट्स हे सेल्सला डॅमेज होण्यापासून आणि जुन्या आजारांच्या धोक्यापासून दूर ठेवण्यास मदत करू शकतात.

  • त्वचा हेल्दी राहते

यामध्ये व्हिटॅमिन, विशेष रुपात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासह त्वचा हेल्दी राहण्यास मदत होते.

  • पचनक्रिया सुधारली जाते

हिरवी मिरची गॅस्ट्रिक ज्यूसच्या प्रोडक्शनला वाढवते आणि पोषक तत्वे अब्जॉर्प्शन वाढवून पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकते.

  • मूड उत्तम होतो

हिरवी मिरची खाल्ल्याने सेरोटोनिन आणि एंडोर्फिन रिलीज होण्यास सुरुवात होते. त्यामुळे मूड सुधारला जातो. तणावही कमी होतो.


हेही वाचा :

सोडा, जलजीरा सतत पिणं आरोग्यासाठी घातक

- Advertisment -

Manini