महिलांनो चाळीशीनंतर करा ‘या’ टेस्ट

महिलांनो चाळीशीनंतर करा ‘या’ टेस्ट

प्रत्येक व्यक्तीला वयाच्या विशिष्ट टप्प्यावर येताच अनेक व्याधी,आजारांचा सामना करावा लागतो. तसेच औषधोपचारासाठी अनेक खर्च देखील करावा लागतो. पण यापुर्वीच प्रत्येकाने आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतल्यावर पुढील भविष्यात होणाऱ्या आजारांवर सहजतेने मात करता येऊ शकते. महिलांना त्यांच्या वयाच्या चाळीशीनंतर आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागते. कारण गरोदरपणातील असाह्य वेदना तसेच पाठदुखी,कंबर दुखी,मेनापॉज,पीसीओडी याकडे अनेक महिला दुलक्षित करत आपले जीवन जगतात. पण चाळीशी नंतर या दुखापती वाढू लागतात यासाठी महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही हेल्थ प्लान मेंटेन करणे गरजेचे आहे.यासाठी त्यांनी वेळोवेळी योग्य तपासणी करत आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सृधृड राखायला हवे.

वजन नियंत्रित ठेवणे

लेडी हार्ड‍िंग मेडिकल कॉलेज मधील स्त्री व प्रसूति रोग विशेषज्ञ डॉ मंजू पुरी यांच्या मते. वयाच्या चाळीशीनंतर महिलांमध्ये हार्मोन तसेच मांसपेशित बदल होण्यास सुरूवात हेते. तसेच या काळात महिलांनी त्यांचे शारीरिक वजन नियंत्रित ठेवणे गरजेचं आहे. या वयात हार्मोन्समध्ये झपाट्याने बदल होत असतो आणि पोटाच्या आसपास चर्बी वाढण्यास सुरूवात होते.

शुगर आणि लिपिड टेस्ट करणे

महिलांना 40-45 वर्षांनी मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो. यामुळे आपल्या आरोग्य चाचणीमध्ये लिपिड टेस्ट आणि शुगर टेस्ट करणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला नेहमीच तुमची शुगर लेवल योग्य आहे की नाही याची माहिती मिळेल

मेमोग्राफी- पेप स्म‍ियर टेस्ट –

महिलांना ब्रेस्ट ओवरी कॅन्सर तसेच यूट्रस  तपासणी दरवर्षी करायला हवी. कारण 40 वर्षापुढील महिलांना कॅन्सरचा जास्त धोका निर्माण होतो असे निर्दशनास आले आहे. यामुळे वेळीच जागरुक राहून तपासणी केली असता यावर लवकर उपाय करणे देखील सोप्पे जाईल किंवा या सारख्या गंभीर आजारावर तुम्ही वेळीच मात करू शकतात.

विटामिन डी टेस्ट

महिलांना नेहमीज मेनापॉज,पीसीओडी,हाडांचे दुखणे यासारख्या समस्या उद्भवत असताता. कदाचित विटामिनच्या कमतरतेमुळे याचा त्रास अधीक वाढण्याची शक्यता असते. यामुळे विटामिन टेस्ट केल्यास शरिरात कोणत्या विटामिनची कमतरात आहे याची माहिती मिळू शकते यासोबतच महिलांनी कॅल्शियम,आयरन,विटामिनयुक्त आहाराच दैनंदिन जीवनात समावेश करावा

मेंटल हेल्थ

45 वर्षानंतर महिलांना मासिक पाळी येणे जवळ-जवळ बंद होते. यामुळेच मूड स्विंग,मानसिक ताण-तणाव, डिप्रेशन,एन्झायटी सारखे लक्षण त्यांच्यात सामान्यत: आढळून येतात. यासाठी ध्यान,व्यायाम,मेडीटेशन,योगा केल्यानंतर महिलांना त्यांचे आरोग्य सुधारण्यास नक्कीच फायदेशीर ठरु शकते.


हे हि वाचा – महिलांनो पावसाळ्यातील इन्फेक्शनच्या समस्या टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

First Published on: July 27, 2021 3:41 PM
Exit mobile version