घरलाईफस्टाईलमहिलांनो पावसाळ्यातील इन्फेक्शनच्या समस्या टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

महिलांनो पावसाळ्यातील इन्फेक्शनच्या समस्या टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Subscribe

पावसाळ्यात अनेकदा महिलांच्या गुप्तअंगामध्ये  होणाऱ्या इंन्फेक्शनचा सामना करावा लागत असल्याचे आढळून आले आहे.

पावसाळ्यामध्ये अनेक आजारांचा सामना लोकांना करावा लागतो यामध्ये डेंग्यू,मलेरीया,टायफाईड सारख्या आजारांबरोबरच महिलांना त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात अनेकदा महिलांना गुप्तअंगामध्ये  होणाऱ्या इन्फेक्शनचा सामना करावा लागत असल्याचे आढळून आले आहे. हवामानातील दमटपणामुळे तसेच अंडरगारमेंट्समुळे देखील अनेकदा त्यांना वजाइनल इन्फेक्शनचा सामना करावा लागतो. आज आपण वजाइनल इन्फेक्शनची लक्षणे तसेच या पासून कसा बचाव करु शकतो या संबधीत काही माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण वजाइनल इन्फेक्श्नची लक्षणे जाणून घेऊया

लक्षणे

महिलांना वजाइनल इंन्फेक्शन दरम्यान त्यांच्या गुप्त अंगामध्ये खाज येणे,लाल डाग होणे, हल्की सूजन येणे यासारखी लक्षणे आढळतात. तसेच सेक्शुअल इंटरकोर्स आणि यूरीनेशन वेळेस गुप्तअंगामध्ये जळन होणे यासारखा त्रास महिलांना सहन करावा लागतो. या सर्वांवर कशा प्रकारे तुम्ही मात करु शकतात यासाठी पुढील माहितीचा वापर महिलांनी दैनंदिन जीवणात करायला हवा

- Advertisement -
मासिक पाळी दरम्यान सतर्कता बाळगणे-

मॉन्सून काळात महिलानी स्वत:ची जास्त काळजी घ्यायला हवी. तसेच मासिक पाळीवेळी योग्य प्रकारे हायजीन,स्वच्छता बाळगायला हवी. डॉक्टरांच्या मते पावसाळ्यात पाळीदरम्यान महिलांनी दर 4 ते 6 तासांनी सॅनिटरी पॅट बदलावा

घट्ट कपडे परिधान करणे टाळावे-

पावसाळ्यात महिलांनी घट्ट कपडे परिधान करने टाळावे. टाइट फिटिंग जीन्स,पॅन्ट अशा कपड्यापांसून दूर राहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते

- Advertisement -
कॉटन अंडरगारमेंट्सचा वापर करणे

पावसाळ्यात वजाइनल इंन्फेक्शनपासून वाचण्यासाठी डॉक्टर्स कॉटन कापडापासून तयार होणाऱ्या अंडरगारमेंट्स वापरण्याचा सल्ला देतात. कॉटनचे कापड आपल्या सॉफ्ट स्किनसाठी फायदेशीर असते .यामुळे गुप्त भागातील ओलावा कमी होण्यास मदत होते

साबणाचा वापर

वजाइनल स्किन खूप सॉफ्ट असते यामुळे साबणाचा वापर करणे टाळावे. साबणात पीएच लेवल जास्त असल्याने याचा वापर केल्यास खाज येणे,लाल डाग पडणे यासारख्या समस्या वजाइनल भागात उद्भवू शकताता

 ‌स्वच्छ आणि कोरडे कपडे वापरणे

पावसाळ्यात कपडे वाळवण्यासाठी अनेदा 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागतो. या दरम्यान तुम्ही अतिरिक्त अंडरगारमेट्सचा वापर करु शकतात पण ओली असणारे कापडे कधीच परिधान करू नये


हे हि वाचा –  Monsoon & Asthma: पावसाळ्यात दम्याच्या रुग्णांनी राहा सावध, अशी घ्या स्वत:ची काळजी

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -