मोठी बातमी : दोन टप्प्यांत होणार 50 हजार शिक्षकांची भरती; केसरकरांची घोषणा

मोठी बातमी : दोन टप्प्यांत होणार 50 हजार शिक्षकांची भरती; केसरकरांची घोषणा

पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

Deepak Kesarkar on Teachers Recruitment: पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसचं आधार व्हेरिफिकेशन विद्यार्थ्यांचे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती यासंदर्भात आकडा कळेल, असंही त्यांनी म्हटलं. केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. ( Big news 30 thousand teachers will be recruited in the first phase and 20 thousand teachers in the second phase Declaration of Deepak Kesarkar )

शंभर टक्के शिक्षक भरती होणार

शिक्षक भरती यासंदर्भात दीपक केसरकर म्हणाले, नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ही शिक्षक भरती करण्याचा आमचा विचार आहे. पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल. मात्र, विद्यार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीचा आकडा कळेल. शंभर टक्के शिक्षक भरती होणार आहे, असंही केसरकर म्हणाले.

शिक्षकांच्या बदलीबाबत केसरकर काय म्हणाले?

शिक्षकंच्या बदलीसंदर्भात ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं. माध्यमिक शिक्षकांनुसार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यासुद्धा रद्द करता येतील का? जेणेकरुन शिक्षक स्थिर होतील, याबाबत महाजन यांच्यासोबत चर्चा केली जाईल. तसंच प्रत्येक शिक्षकाला आपल्या गावातच पोस्टिंग मिळेल असं नाही, मात्र जवळच्या गावात पोस्टींग देता येईल, असं केसरकर यांनी म्हटलं.

( हेही वाचा: शरद पवारांची चौफेर फटकेबाजी; शिंदे, राऊतांसह पृथ्वीराज चव्हाणांचाही घेतला समाचार )

शिक्षकांची बदली झाली नाही तर एक जबाबदारीची जाणीव शिक्षकांमध्ये असते. एखादा शिक्षक अजिबात चांगला शिकवत नसेल तर त्याच्या संदर्भात वेगळे निर्णय घ्यावे लागतील. आतपर्यंतच्या शिक्षकांची शिक्षा म्हणून बदली करावी लागायची. आता बदली न करता त्या शिक्षकांना ट्रेनिंग द्यावी लागेल, असं दीपक केसरकर म्हणाले.

First Published on: May 9, 2023 4:45 PM
Exit mobile version