महागाईचा फटका! भारताचा वृद्धिदर निम्म्याने घसरला, कृषीक्षेत्र मात्र तेजीत

महागाईचा फटका! भारताचा वृद्धिदर निम्म्याने घसरला, कृषीक्षेत्र मात्र तेजीत

नवी दिल्ली – जुलै ते सप्टेंबर तिमाहिती वृद्धिदर जवळपास निम्म्याने घसरला आहे. या दुसऱ्या तिमाहित (Second Quarter) ६.३ टक्क्यांचा वृद्धिदर नोंदवण्यात आला आहे. पहिल्या तिमाहित म्हणजेच एप्रिल ते जून या तिमाहित वृद्धिदर १३.५ टक्के नोंदवण्यात आला होता. महागाईमुळे व्याजदर वाढवल्याने वृद्धिदर मंदावले असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – NDTV अदानी समूहाच्या ताब्यात; संस्थापकांनी दिला राजीनामा, नवे मंडळही नियुक्त

जागतिक पातळीवर मंदीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, भारतातही महागाईने उच्चांक गाठला आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्याकरता मध्यवर्ती बँकेकडून व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. या व्याजदर वाढीचा प्रतिकूल परिणाम होऊन सरलेल्या तिमाहित विकासदर खालवला असल्याचं राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने स्पष्ट केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, दुसऱ्या तिमाहित वृद्धिदर निम्मा राहील असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता.

हेही वाचा – वैयक्तिक आयकराचे दर कमी करा, अर्थसंकल्पासाठी सीआयआयचा अहवाल

केंद्र सरकारने रस्ते, रेल्वेसारख्या पायाभूत सुविधांवर खर्च वाढवला आहे. त्यामुळे सरकारी भांडवली खर्चात ४० टक्क्यांपेक्षा वाढ झाली आहे. या निर्मिती क्षेत्रातील मूल्यवर्धित दर उणे ४.३ टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्यावर्षी याच तिमाहित हा दर ५.६ टक्के होता. सर्वच क्षेत्रातील वृद्धिदर कमी झालेला असताना कृषी क्षेत्रातील वृद्धिदरात वाढ झाली आहे. एप्रिल ते जून तिमाहिती ४.५ टक्के वृद्धिदर होता. तर, जुलै ते सप्टेंबर या तिमाहित वृद्धिदर ४.६ टक्के झाला आहे. तर, गेल्यावर्षी याच तिमाहित वृद्धिदर ३.२ टक्के होते.

हेही वाचा – मंदीची चाहूल! अॅमेझॉनसुद्धा करणार सर्वात मोठी नोकर कपात

कोणत्या क्षेत्रात किती दर

भारत चीनपेक्षा सरस

एकीकडे वृद्धिदर मंदावला असला तरीही चीनपेक्षा भारतीय अर्थव्यवस्था सरस आहे. जुलै ते सप्टेंबर तिमाहित चीनच्या अर्थव्यवस्थेने ३.९ टक्क्यांचा वाढीचा दर राहिला आहे. कोरोना उद्रेक, लॉकडाऊन यामुळे चीनमधील अर्थव्यवस्था अद्यापही डगमगलेलीच आहे. त्यामुळे चीनमधील अर्थव्यवस्थेपेक्षा भारताची अर्थव्यवस्था सरस ठरली आहे.

हेही वाचा – मुंबई पहिल्या क्रमांकावर… पण जीएसटी बुडविण्यात; एकूण 68 जणांवर कारवाई

First Published on: December 1, 2022 9:25 AM
Exit mobile version