घरअर्थजगतमुंबई पहिल्या क्रमांकावर... पण जीएसटी बुडविण्यात; एकूण 68 जणांवर कारवाई

मुंबई पहिल्या क्रमांकावर… पण जीएसटी बुडविण्यात; एकूण 68 जणांवर कारवाई

Subscribe

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वस्तू व सेवाकर विभागाची बैठक घेतली होती.

वस्तू व सेवाकर म्हणजेच जीएसटी (GST) चे संकलन मागील तीन वर्षांपासून राज्यात वाढते आहे. पण असे असले तरीही मात्र जीएसटी बुडविणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे. जीएसटी बुडविणाऱ्या विविध प्रकरणांत आतापर्यंत 68 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जीएसटी बुडविणाऱ्यांची संख्या मुंबईत (MUMBAI) असल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील एकूण जीएसटी बुडविणाऱ्यांपैकी 66.2 टक्के प्रमाण मुंबईत आहे. राज्यातील एकूण 68 प्रकरणांपैकी 45 प्रकरणे ही मुंबईतच असल्याची माहिती मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या जीएसटी संकलनामध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यात जीएसटी (GST COLLECTION) संकलनाने प्रतिमहिना 22 हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठल्याची माहिती जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्यात जीएसटी बुडविणाऱ्यांचा आकडाही वाढत असल्याचे दिसून आले. राज्यात 2020-2021 या आर्थिक वर्षात जीएसटी बुडविणाऱ्यांची एकूण 11 प्रकरणे आढळून आली. त्यानंतर 2021-2022 या काळात हा आकडा नऊपर्यंत खाली आला होता. मात्र यंदाच्या आर्थिक वर्षांत जीएसटी बुडविणाऱ्यांची एकूण 48 प्रकरणे आढळली असल्याची माहिती मिळाली.

- Advertisement -

दरम्यान काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM DEVENDRA FADNAVIS) यांनी वस्तू व सेवाकर विभागाची बैठक घेतली होती. या बैठकीत यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. जीएसटी बुडविणाऱ्यांवर आळा घालणे गरजेचे आहे त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आखण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. अशी माहिती मिळत आहे.

जीएसटी (GST) बुडविणाऱ्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, मुंबईमध्ये सर्वाधिक कर बुडविण्याचे प्रमाण आहे. राज्यातील एकूण प्रकरणांपैकी मुंबईचे प्रमाण 66.2 टक्के एवढे आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यामध्ये एकूण आठ प्रकरणे आढळली असून हे प्रमाण 11.8 टक्के एवढे आहे. पुण्यापाठोपाठ रायगडमध्ये चार प्रकरणे आढळली. हे प्रमाण 5.9 टक्के एवढे आहे. पुण्यानंतर नागपुरमध्ये तीन म्हणजे 4.4 टक्के प्रकरणे आढळली. त्यानंतर औरंगाबाद, कोल्हापूर आणि पालघरमध्येही प्रत्येकी दोन प्रकरणे आढळली. हे प्रमाण 2.2 टक्के एवढे आहे. याचबरोबर नाशिक आणि अमरावतीमध्ये प्रत्येकी एक म्हणजे 1.5 टक्के प्रकाराने आढळून आली आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; फोर्ब्सच्या यादीत 3 भारतीय महिलांचा समावेश

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -