गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदेंच शक्तिप्रदर्शन: नवे फोटो व्हायरल

गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदेंच शक्तिप्रदर्शन: नवे फोटो व्हायरल

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरींनंतर सुरतनंतर आता गुवाहाटीमध्येही मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केलं आहे. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आता समोर येत आहेत. यावेळी एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीमधील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये महाराराष्ट्रातील 42 बंडखोर आमदार दिसत आहे. यामध्ये शिवसेनेचे 35 तर 7 अपक्ष आमदार आहे. दरम्यान शिंदेंच्या बंडखोरीनंतर आता राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

यावेळी उपस्थित काही आमदारांचा “एकनाथ शिंदे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है,” अशा घोषणा देतानाचा व्हीडिओत समोर येत आहे. काल शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी बंडखोर शिवसेना आमदारांना पुन्हा पक्षात परत येण्याचे भावनिक आवाहन केले. मात्र त्यानंतरही एकनाथ शिंदेंसोबतचा बंडखोर आमदारांचा गट त्यांच्या आव्हानाला साद देण्यास तयार नाही. यातच आज सकाळी पुन्हा आणखी चार आमदार गुवाहाटीमधील एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. आमदार सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर यांच्यासह आशिष जैस्वाल, दीपक केसरकर, संजय राठोड हे आमदार शिंदे गटात सहभागी झाले, यानंतरचं एकनाथ शिंदे यांच्या गटाने दुपारी एकत्र येत शक्ती प्रदर्शन केलं आहे.

आणखी वाचा

दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान मुंबईत आज मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर शिवसेना नेते आणि आमदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे 17 आमदार उपस्थित होते. तर यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेतली.

यावेळीही सुनील प्रभू (मालाड), राजन साळवी (राजापूर), प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), सुनील राऊत (विक्रोळी), वैभव नाईक (कुडाळ-मालवण), आदित्य ठाकरे (वरळी), रमेश कोरगावकर (भांडुप), कैलास पाटील (पाचोरा), नितीन देशमुख (बाळापूर), अजय चौधरी (शिवडी), राहुल पाटील (परभणी), संतोष बांगर (हिंगोली), भास्कर जाधव (गुहागर), रवींद्र वायकर (जोगेश्वरी), संजय पोतनीस (कलिना), कैलास पाटील (उस्मानाबाद) आणि उदय सामंत (रत्नागिरी), असे एकूण १७ आमदार बैठकीला उपस्थित होते.


एवढा मोठा पोलीस फौजफाटा मी कधीच पाहिला नाही, सुरतला पोहोचल्यावर नितीन देशमुखांनी कशी केली सुटका?


First Published on: June 23, 2022 3:46 PM
Exit mobile version