मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरींची नेमणूक केलीय, ते पत्र मी स्वीकारलंय – उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

Assembly vice-president Narhari Jirwal

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांची सही तपासून घेणार असल्याचं सांगितलं आहे. कायद्यामध्ये पक्षप्रमुखांनी गटनेता नेमायचा असतो. त्यानंतर गटनेत्याने प्रतोदाची नेमणूक करायची असते. परंतु एकनाथ शिंदे हे विधीमंडाळाचे गटनेता प्रमुख होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र दिल्यानंतर अजय चौधरी यांची गटनेतेपदी नेमणूक करण्यात आली होती. तर सुनील प्रभू यांनीच प्रतोद म्हणून पत्रावर सही केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरींची नेमणूक गटनेतेपदी केली आहे. ते पत्र मी स्वीकारलं आहे, असं नरहरी झिरवाळ म्हणाले.

आमदार नितीन देशमुख हे त्यांच्या गावी नागपूरला आहेत. त्यांनी मला सांगितलं की, मी माझी सही इंग्रजीमध्ये करतो. परंतु त्या पत्रावरची सही ही मराठी आहे. त्यामुळे मला त्यामध्ये ग्राह्य धरू नये. यासाठी ते मी तपासून घेणार आहे. तसेच माझी खात्री झाल्यानंतर त्यावर विचार करणार आहे, असं नरहरी झिरवाळ म्हणाले.

दोन-तृतीयांश आमदार असणाल्यानंतर गटाला मान्यता मिळणार का?

शिंदे यांच्या गटात दोन-तृतीयांश आमदार आहेत की नाहीत, याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. शिंदेंकडे जर ४० हून अधिक आमदार आहेत. परंतु जर ते दावा करत असतील तर हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. जो काही निर्णय असेल तर तो कायद्यानुसार घेतला जाईल. त्यांच्याकडे जरी ४० हून अधिक आमदार असले तरीसुद्धा माझ्यासमोर कोणतीही माहिती समोर आलेली नाही, माझ्याकडे आल्यावर मी घटनेत असेल त्याप्रमाणे अभ्यास करुन निर्णय घेईल. जे सह्यांचं पत्र माझ्याकडं आलंय त्यात सह्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं त्यातही अभ्यास करुन मी निर्णय घेणार आहे, असं झिरवाळ म्हणाले.


हेही वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयातील सर्व सचिवांना संबोधित करणार