शिवसेना सोडून गेलेले आमदार पुन्हा निवडून आले नाहीत, अजित पवारांचा बंडखोरांबाबत आक्रमक पवित्रा

शिवसेना सोडून गेलेले आमदार पुन्हा निवडून आले नाहीत, अजित पवारांचा बंडखोरांबाबत आक्रमक पवित्रा

बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडून स्वतंत्र गट तयार केला. या गटासोबत दोन तृतीयांश आमदार असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने शिंदे गटाने भाजपसोबत युती करून राज्यात सत्ता स्थापन केली. या प्रकरणावरून राज्यात बरेच आरोप होत असताना गेले काही दिवस याप्रकरणावरून गप्प राहिलेले अजित पवार यांनी आज बंडखोर आमदारांना धारेवर धरलं. शिवसेनेसोबत बंडखोरी करणारे आमदार पुन्हा निवडून येत नाहीत, असं म्हणत त्यांनी त्यांच्याच पक्षातील छगन भुजबळ यांचं उदाहारण दिलं. (MLAs who left Shiv Sena were not re-elected, Ajit Pawar’s aggressive stance on rebels)

हेही वाचा – सर्वगुणसंपन्न शिंदेंसारख्या नेत्याला एकच खातं का दिलं? अजित पवारांचा फडणवीसांना प्रतिप्रश्न

अजित पवार म्हणाले की, ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही ते लोकही विचार करायला लागले आहेत. गेल्या आठ-दहा दिवसांत जे काही घडलं यात कोण चूक कोण बरोबर यावर सामान्य लोक चर्चा करू लागले आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांत तब्बल ४० आमदार तुमच्यासोबत गेले. ठाकरेंवर अविश्वास दाखवून तुम्ही बाजूला झालात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावं लागलं. पण विचार करा यामुळे सामान्य जनतेत काय संदेश गेला असेल. त्यामुळे जे काही केलं ते उद्धव ठाकरेंना विश्वासाघात घेऊन करायला पाहिजे होतं, असं अजित पवार म्हणाले.

बाळासाहेबांच्या शिवसेनेतून जे बाहेर पडले ते आमदार नतंर निवडून आले नाहीत. छगन भुजबळही शिवसेनेविरोधात गेले. त्यामुळे शिवसेनेविरोधात जे बाहेर पडले ते किती आमदार निवडून आले याचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा – पुन्हा येईन, म्हणालो होतो, पण एकटा आलो नाही; टिंगल करणाऱ्यांना फडणवीसांनी झापलं

दरम्यान, राजकीय विश्लेषकांनी सांगितल्यानुसार शिवसेनेमध्ये आतापर्यंत गणेश नाईक, छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी बंड केले. छगन भुजबळ यांच्यासोबत १७ आमदार, नारायण राणे यांच्यासोबत १३ आमदार तर, एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार शिवसेनेबाहेर पडले. मात्र इतिहास असं सांगतो की सेनेबाहेर पडलेले आमदार पुन्हा निवडून आले नाहीत. गेल्या तीन वर्षांचा राजकीय इतिहास पाहता केवळ छगन भुजबळच राजकारणात उरलेले आहेत. नारायण राणेंसह गेलेल्या १६ आमदारांपैकी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच आमदार राजकारणात सक्रीय आहेत. त्यामुळे येत्या ३१ व्या विधासनभा निवडणुकीत ४० बंडखोर आमदारांपैकी किती आमदार निवडून येतात हे पाहावं लागेल.

राज्यपालांवरही निशाणा

शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना बहुमताचा ठराव घाईघाईत आणणे गरजेचे नव्हते. राज्यपालांनी आतापर्यंत अनेक गोष्टी लांबणीवर टाकल्या. अनेकदा अनेक समस्या घेऊन मी आणि एकनाथ शिंदे राज्यपालांकडे गेलो. राज्यपाल आम्हाला थांबवून बऱ्याच गोष्टींवर चर्चा करायचे. पण तरीही अनेक कामं रेंगाळली. मात्र, आता राज्यपाल एकदम अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आमच्या काळात १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी त्यांनी वेळ दिला नाही. विधानसभा अध्यक्ष पदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतरही आम्ही राज्यपालांकडे वेळ मागितली. विविध अधिवेशनात याबाबत मागणी केली. कॅबिनेटमध्ये ठरावही करायचो. पण अध्यक्षपदाची तारीख तेव्हा लागली नाही. मात्र, नवं सरकार सत्तेत आल्यानंतर तत्काळ अध्यक्षपदाची निवडणूक लागली.

दोन तास गप्पा मारून गेले तरीही…

अजित पवार आपल्या अधिवेशनाच्या भाषणात नेहमीच हटके शैली वापरतात. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ते आपले मत मांडत असतात. यावेळीही त्यांनी अनेक नेत्यावंर मिश्किल टिप्पणी केली. यावेळी त्यांनी बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनाही टोला लगावला. सूरतला जाण्याआधी अब्दुल सत्तार माझ्याशी आणि जयंत पाटलांशी दोन तास बोलले. आमच्यात चांगल्या गप्पा झाल्या. पण त्याहीवेळी त्यांनी बंडखोरीबाबत काहीही सांगितलं नाही. आमच्याशी दोन तास गप्पा झाल्यानंतर ते थेट सूरतलाच गेले, असं अजित पवार म्हणाले.

…यात काहीतरी काळंबेरं

१०६ आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही. पण ५० आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होते. यात नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे, असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा

First Published on: July 4, 2022 1:37 PM
Exit mobile version