बोरू बहाद्दर कारकून, “ढ” टीम चे कप्तान तोंडावर आपटले; संदीप देशपांडेंनी शिवसेनेची उडवली खिल्ली

बोरू बहाद्दर कारकून, “ढ” टीम चे कप्तान तोंडावर आपटले; संदीप देशपांडेंनी शिवसेनेची उडवली खिल्ली

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठीचे निकाल झाले. यात सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या गेल्या सहाव्या जागेवर शिवसेनेच्या संजय पवार यांचा भाजपच्या धनंजय महाडिक यांनी पराभव करत विजय प्राप्त केला. तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार यात विजयी झाले, तर एकट्या भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले, त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी महाविकास आघाडी सरकारवर (Maharashtra Navnirman Sena) भारी पडल्याचे म्हटले जातेय, यावरून आता मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेला डिवचलं आहे.

शिवसेना ही महाविकास आघाडीतील “ढ”टीम आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल’, बोरू बहाद्दर कारकून आणि “ढ” टीम चे कप्तान तोंडावर आपटले. अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.

भापजचे पियुष गोयल आणि अनिल बोंडे 48 मतांनी तर धनंजय महाडिक यांना 41 मतांनी विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीतील शिवसेना नेते संजय राऊत यांना 41, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल 43, तर काँग्रेसचे इमरान प्रतापगढी 44 मतांनी विजयी झाले आहेत.

भाजपने महाविकास आघाडी समर्थक 6 अपक्ष आमदारांना फोडले आणि पहिल्या पसंतीची मतं मिळवली. तसेच मनसेने 1 मत आणि बहुजन विकास आघाडीनेही त्यांची 3 मतं भाजपला दिली. त्यामुळे एकूण 10 अतिरिक्तं मतं भाजपला मिळाली. यामुळे संख्याबळामुळे भाजपचे तीनही उमेदवार जिंकून आले.


फडणवीसचं भाजपच्या विजयाचे किंग ; उद्धव ठाकरे – शरद पवार यांना दिला धोबीपछाड

 

First Published on: June 11, 2022 10:52 AM
Exit mobile version