फडणवीसचं भाजपच्या विजयाचे किंग ; उद्धव ठाकरे – शरद पवार यांना दिला धोबीपछाड

Fadnavis is the king of BJP's victory rajya sabha elections 2022 Uddhav Thackeray Sharad Pawar

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात ठेवून भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराला विजय मिळवण्यात माजी मुख्यमंत्री विद्यमान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  यांचीच रणनीती कामाला आली. फडणवीस हेच भाजपच्या विजयाचे किंग असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धोबीपछाड दिला. 41 मतांचा कोटा असतानाही फडणवीस यांच्या चाणक्यनितीने पहिल्या दोन्ही उमेदवारांना 48 मतांचा कोटा देण्यात आला. तर तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना अपक्ष, छोटे पक्ष, भाजपची 27 मते दिली.

भाजप आणि अपक्ष असे मिळून 113 आमदार असतानाही महाडिक यांना 123 मते मिळाल्याने फडणवीसांनी महाविकास आघाडीचे 10 आमदार आपल्यासोबत घेतले. त्यामुळे महाविकासचीच आघाडीचीच मते फुटली असून हा मोठा धक्का मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच आजच्या भाजपच्या विजयाचे खरे शिल्पकार आहेत असे मत भाजपच्या अनेक आमदारांनी व्यक्त केलं आहे. (Rajya Sabha Results 2022)

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं नियोजन आणि समन्वय सुरुवाती पासूनच नव्हत. अपक्षांनी आघाडीच्या बैठकीस उपस्थिती लावली पण मतदान भाजप उमेदवाराला केलं. देवेंद्र फडणवीस यांनी एक हाती रणनीती राबवून शिवसेनेला पराभूत केले. देवेंद्रजी काय करत आहेत याचा थांगपत्ता कोणालाच नव्हता. या भाजप विजयाचा आवाज अनेक दिवस घुमत राहणार आहे, असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्रीकांत देशपांडे यांनी देखील मांडलं आहे.  (Maharashtra Rajya Sabha)

राज्यसभा निवडणूकीचा निकाल 

एकूण २८४ मते वैध

मत कोटा किमान – ४०.५८

पहिल्या पसंतीचे मते आणि विजयी उमेदवार

संजय राऊत – शिवसेना- 42

प्रफुल पटेल – राष्ट्रवादी काँग्रेस- 43

इम्रान प्रतापगडी – काँग्रेस- 44

पियुष गोयल -भाजप- 48

अनिल बोंडे – भाजप- 48

सहाव्या जागेवर कोणत्या उमेदवाराची बाजी?

  1. धनंजय महाडिक – भाजप – 41
  2. संजय पवार- शिवसेना – 33

    भाजपच्या विजयानंतर फडणवीसांचे ट्विट

महाडिकांच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत म्हटले की, निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती’. दरम्यान निवडणुकीच्या सुरुवातीपासूनचं शिवसेनेच्या संजय पवारांचे वर्चस्व दिसून येत  असतानाही भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत धनंजय महाडिकांचा विजयासाठी प्रयत्न केले. आणि अखेर धनंजय महाडिक विजय झालेचं. यामध्ये देवेंद्र फडणीसांच्या स्ट्रॅटेजीसमोर महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही ठाव फसल्याचे दिसले. भाजप आणि अपक्ष मिळून 116 होते. पण त्यांना 123 मत मिळाली त्यामुळे अपक्षांची साथ भाजपला मिळाली आहे.