‘ठीक आहे, आज ते जिंकले, उद्या…’ राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

दरम्यान या निवडणुकीत शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार या दोघांचा विजय होईल असा दावा केला जात होत. मात्र 9 तासानंतर सुरु झालेल्या मतमोजणीत संजय पवार यांना फक्त 38 मतं मिळाली तर धनंजय महाडिकांना 41 मतं मिळाली.

rajyasabha election results 2022 bjp dhananjay mahadik wins shivsena sanjay pawar loose devendra fadanvis sanjay raut reaction

९ तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांता निकाल अखेर जाहीर झाला. या निकालात महाविकास आघाडीचे ती आणि भाजपचे तीन उमेदवार हे विजयी झाले आहेत. मात्र सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिकांनी शिवसेनाच्या संजय पवार यांची पराभव केला आहे. दरम्यामन या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने असलेली अपक्षांची मते फुटल्याचे समोर आलेय. महाविकास आघाडी सरकरामधील शिवसेने नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी विजयी झाली आहे. दरम्यान भाजपच्या दणदणीत विजयावर शिवसेनेना नेते संजय राऊत यांनी म्हटले की, “ठीक आहे, आज ते जिंकले, उद्या पाहू”. “तुम्ही जिंकलात
पण विजय झाला नाहीः”

“चंद्रकांत पाटीलांना वाढदिवशी कोल्हापूरचा एक पैलवानच भेट दिला”

दरम्यान या निवडणुकीत शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार या दोघांचा विजय होईल असा दावा केला जात होत. मात्र 9 तासानंतर सुरु झालेल्या मतमोजणीत संजय पवार यांना फक्त 38 मतं मिळाली तर धनंजय महाडिकांना 41 मतं मिळाली. त्यामुळे भाजपचे धनंजय महाडिकचं विजय असल्याचे स्पष्ट झाले. परंतु हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पण दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांची रणनीती कामी आल्याचं खुद्द भाजप आमदारांकडूनच सांगितलं जात आहे. याव विजयावर प्रतिक्रिया देत फडणवीसांनी ‘आमचे महाडिक शिवसेनेच्या संजय राऊतांपेक्षा जास्त मतांनी विजयी’ असा टोला लागावला आहे. तर धनंजय महाडिकांच्या विजयावर फडणवीस पुढे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवशी त्यांना कोल्हापूरचा एक पैलवानच भेट दिला. तर हा विजय लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक यांना अर्पण करतो. असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.