फडणवीसांना विविध मार्गांनी माणसं आपलीशी करण्यात यश; शिवसेना उमेदवाराच्या पराभवावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

मतांवरील आक्षेप हा भाजपचा हा रडीचा डाव,  शरद पवारांचा घणाघात 

ncp sharad pawar reaction on rajyasabha election

महाराष्ट्रातील राज्यसभेसाठीच्या सहा जागांसाठी काल मतदान पार पडले. यामध्ये महाविकास आघाडी सरकरामधील शिवसेने नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी विजयी झाली आहे. तर भाजपच्या पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक या तीन उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. दरम्यान सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने ऐनवेळी धनंजय महाडिक हा सात उमेदवार रिंगणात उतरवला. यामुळे शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेला उमेदवार संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सहाव्या जागेच्या विजयासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार प्रयत्न करत होते. त्यामुळे शिवसेनेसाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे. राज्यसभेच्या या निकालानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गांनी माणसे आपलीशी करण्यात यश आल्याचं म्हणत शरद पवार यांनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे. आज सकाळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी पवारांची पुण्यात भेट घेतली. यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

शरद पवार म्हणाले की, “मला स्वत:ला फार धक्का बसेल असा निकाल नाही. मतांची संख्या पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवेसना आणि काँग्रेस यांच्या उमेदवारांनी जो कोटा दिला त्या कोट्यात काही फरक पडलेला नाही. फक्त एक मत त्यांना जादा पडलं आहे. ते कोणत्या मार्गाने आलं ते मला ठावूक आहे, ते या आघाडी सरकारचं नाही तर दुसऱ्या बाजूचं आहे.”

शरद पवारांकडून फडणवीसांचे कौैतुक 

“शिवसेनेने लढवलेल्या सहाव्या जागेवर आमची जास्त पावर होती. मतांची संख्या कमी होती पण धाडस केलं प्रयत्न केला, यामध्ये अपक्षांची संख्या भाजपाकडे अधिक होती पण दोघांनाही पुरेशी नव्हती. त्यामुळे भाजपाला आम्हाला पाठिंबा देणारे जे इच्छुक होते त्यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी भाजपाने जी कारवाई केली त्यामध्ये त्यांना यश आले. त्यामुळे हा फरक पडला आहे. आघाडीच्या एकंदर संख्येप्रमाणे त्यांना मतदान झालं आहे. यामध्ये वेगळे काही नाही. जो चमत्कार झाला तो मान्य केला पाहिजे की, देवेंद्र फडणवीस यांना विविध मार्गांनी माणसे आपलीशी करण्यात यश आले आहे”, अशा शब्दात  शरद पवार यांनी फडणवीसांचे कौतुक केले आहे.

मतांवरील आक्षेप हा भाजपचा हा रडीचा डाव,  शरद पवारांचा घणाघात 

“याचा मविआ सरकारवर काही फरक पडणार नाही. एखादं मतं इकडे तिकडे ज्यादा घेतलं. फार काही फरक पडला नाही. अपक्षांच्या मतांमध्ये गमंती झाल्या आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप मत फुटल नाही.  राष्ट्रवादीला आलेले ज्यादा मत हे शिवसेना जाणार नव्हत, आमच्या विरोधकांच्या कोट्यातील एक मत होते ते राष्ट्रवादीला आले. त्यांच्यातील अनेक लोक आहेत ज्यांनी कधी काळी माझ्याबरोबर काम केलं आहे मी शब्द टाकला तर ते नाही म्हणत नाही, पण मी त्यात पडलो नाही..एकाने मला स्वतः हून मत दिले असं सांगितल. भाजपच्या बाजूने असलेलं एक मत फुटलं. मतांवरील आक्षेप हा भाजपचा हा रडीचा डाव” असल्याचा घणाघात पवारांनी केला आहे.