देशभरातील दारुगोळा कारखान्याचे कर्मचारी संपावर

देशभरातील दारुगोळा कारखान्याचे कर्मचारी संपावर

देशभरातील दारुगोळा कारखान्याचे कर्मचारी आजपासून संपावर गेले आहेत. पुण्यातील तीन दारुगोळा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. दारुगोळा कारखान्यांच्या खाजगीकरणाविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. कामगार संघटना, कर्मचारी, अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता केंद्र सरकारने खासगीकरणाचा निर्णय घेण्याचे ठरविले असल्याचा आरोप कामगारांकडून केला जात आहे. देशभरात ऐकून १ लाख कर्मचारी हे त्यावर अवलंबून आहेत, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. दरम्यान, यामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असून आज पासून एक महिना केंद्र सरकारचा विरोध केला जाणार आहे. या दारुगोळा कारखान्यांमधून तिन्ही सशस्त्र दले, सर्व निमलष्करी दले, सर्व केंद्र शासित पोलीस दले यांना वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्रे व दारुगोळा पुरवण्याचे काम केले जाते. मात्र, सद्य स्थितीला केंद्र सरकारने सर्व भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीना निगमीकरणाचा घाट घातला आहे. त्यामुळे कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

काय आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

दारुगोळा कारखाना अर्थात ऑर्डीनन्स फॅक्टरीमध्ये सैन्यासाठी लागणारा दारुगोळा बनवण्यात येतो. हे कारखाने सरकारी आहेत. मात्र, आता या कारखाण्यांचे खाजगीकारण व्हावे, असा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. त्यामुळे दारुगोळा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. हे कर्मचारी आता एक महिन्यासाठी संपावर जाणार आहेत. देशभरात एकूण ४१ ऑर्डीनन्स फॅक्टरी आहेत. यातील १० कारखाने हे महाराष्ट्रात आहे आणि या १० कारखान्यांमधील ३ कारखाने पुण्याच्या एक औंद, खडकी आणि देहू रोड येथे आहेत. सरकारकडून खासगीकरणाचा जो प्रयत्न केला जात आहे, त्याच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी कारखान्यांबाहेर आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनामध्ये सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी या कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळ मुंबईत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी देखील त्यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे या आंदोलकांना मनसेचा देखील पाठिंबा आहे.


हेही वाचा – राज ठाकरेंच्या भेटीनंतर विद्या चव्हाण म्हणाल्या, ‘आंदोलन होणारच’

First Published on: August 20, 2019 10:44 AM
Exit mobile version