घरमुंबईराज ठाकरेंच्या भेटीनंतर विद्या चव्हाण म्हणाल्या, 'आंदोलन होणारच'

राज ठाकरेंच्या भेटीनंतर विद्या चव्हाण म्हणाल्या, ‘आंदोलन होणारच’

Subscribe

राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, याबाबत राज ठाकरे निर्दोष असून सरकार विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी ईडीचे हत्यार वापरत असल्याचे चव्हाण म्हणाल्या.

‘सरकारकडून पोलीस प्रशासनाचा आणि ईडीचा गैरवापर केला जात आहे. सरकार ईडीचे हत्यार वापरुन विरोधकांना दडपण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, सरकारची ही दडपशाही चालणार नाही. सरकार आम्हाला ईव्हीएमची भीती दाऊ शकत नाही. ईव्हीएमची भीती दाखवून सरकार किती जणांच्या चौकशी करणार आहे? त्यापेक्षा जेलभरो आंदोलनच करा. त्यामुळे कितीही काही झाले तरी ईव्हीएम विरोधात आंदोलन होणारच’, असे राष्ट्रवादीचे आमदार विद्या चव्हाण यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी ईडीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. राज ठाकरे यांना २२ ऑगस्ट रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ईडीचे अधिकारी त्यांची चौकशी करणार आहेत. ईडीच्या याच नोटीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राज ठाकरेंची भेट घेतली आहे. यासंदर्भात ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने माहिती दिली आहे. या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विद्या चव्हाण यांनी राज ठाकरे यांनी पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. याशिवाय राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष पूर्णपणे राज ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा – कोहिनूर खरेदी प्रकरण नेमकं आहे तरी काय?

- Advertisement -

नेमके काय म्हणाल्या विद्या चव्हाण?

विद्या चव्हाण म्हणाले की, ‘जेव्हापासून राज ठाकरेंनी ईव्हीएम मशीनच्या विरोधात सर्वपक्षीय आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हापासून सरकारचे धाबे दणाणले आहे. हे सरकार ईव्हीएमचे सरकार आहे. त्यांना एकदा केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर राज्यातही ईव्हीएमद्वारे सत्ता मिळवायची आहे. ईव्हीएमद्वारे सत्ता मिळू नये यासाठी हे आंदोलन होणार आहे. मात्र हे आंदोलन होऊ नये, असे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. आमच्याकडे कमी लोकांना ईडीच्या नोटीसी पाठवण्यात आल्या आहेत का? सरकारची ही ससेमिरी सुरु आहे. ईडीची ही हत्यारे किती लोकांवर तुम्ही वापरणार आहात? आणि राज ठाकरेंसोबत आम्ही सगळे उभे आहोत. त्यामुळे हा मोर्चा हा निघणारच आणि हे आंदोलन होणार आहे.’ विद्या चव्हाण महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या विरोधात आंदोलनाला बसल्या होत्या. या आंदोलनानंतर त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.


हेही वाचा – ईडीला चौकशीसाठी सहकार्य करेल – उन्मेश जोशी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -