ठाकरे गटाची संपत्ती शिवसेनेला देण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

ठाकरे गटाची संपत्ती शिवसेनेला देण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

ठाकरे गटाची संपत्ती शिवसेनेला देण्याबाबतची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. वकिल आशिष गिरी यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यांची संपत्तीवर दावा करणारी ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आशिष गिरी यांच्या शिवसेना ( शिंदे गट) यांच्याशी काहीही संबंध नाही, असं म्हणत न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.   ( Supreme Court rejects Thackeray group’s plea to hand over assets to Shiv Sena advocate Ashish giri filed Petition )

निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह यावर निर्णय दिल्यानंतर, हे स्पष्ट झालं होतं की अधिकृत शिवसेना ही शिंदे गटाची आहे. त्याचाच आधार घेत आशिष गिरी या वकिलांनी ठाकरे गटाची मालमत्ता शिवसेनेला मिळावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. शिवसेनेची ( ठाकरे गट) जी काही मालमत्ता आहे. शिवसेना भवन, स्थावर आणि जंगम मालमत्ता शिवसेनेला( शिंदे गट) मिळावी, अशी याचिका गिरी यांनी दाखल केली होती. यावर शिवसेनेने (शिंदे गट) आपला आशिष गिरी यांच्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं होतं.

सर्वोच्च न्यायालय म्हणालं की आधीच याबाबत आधीच एक याचिका दाखल असताना नवी याचिका दाखल करणारे तुम्ही कोण? असं विचारत न्यायालयाने गिरी यांची याचिका फेटाळून लावली आहे.

गिरी यांच्या याचिकेत काय

वकिल आशिष गिरी यांनी दाखल केलेल्या याचिकेत शिवसेनेचा (ठाकरे गट) पक्षनिधी, याशिवाय संपत्ती, संस्था, कार्यालय, शाखा सर्व शिंदे गटाच्या ताब्यात द्या. शिवसेना पक्ष कुणाचा यावर निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. त्यानुसार शिवसेनेचे बँक खाते केवळ शिवसेनेचे असेल, तर त्याचे सर्व अधिकार शिंदे गटाला जातात. त्यामुळे पक्षनिधी शिंदे गटाकडे वर्ग करावा, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.

( हेही वाचा: भाजपला शिंदे सरकारचं नाही तर ठाकरेंचं ओझं मविआला झालंय, नितेश राणेंचा पलटवार )

शिवसेना भवनावर आमचा दावा नाही – नरेश म्हस्के

शिवसेना भवन आणि पक्षनिधी आमच्या ताब्यात मिळावा अशी कोणत्याही प्रकारची याचिका आम्ही दाखल केलेली नाही. संबंधित याचिका दाखल करणारे अ‍ॅड. आशिष गिरी यांच्याशी शिवसेना पक्षाचा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिले होते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हीच आमची खरी संपत्ती असून ती आम्हाला पुरेशी आहे, असेही म्हस्के म्हणाले.

First Published on: April 28, 2023 12:10 PM
Exit mobile version