घरताज्या घडामोडीभाजपला शिंदे सरकारचं नाही तर ठाकरेंचं ओझं मविआला झालंय, नितेश राणेंचा पलटवार

भाजपला शिंदे सरकारचं नाही तर ठाकरेंचं ओझं मविआला झालंय, नितेश राणेंचा पलटवार

Subscribe

भाजपला राज्यातील शिंदे सरकारचं ओझं झालं आहे. हे ओझं किती काळ घेऊन फिरायचं असं त्यांना वाटतं आहे. त्याबाबतच्या चर्चा मीही ऐकून आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर निशाणा साधला होता. तसेच रिफायनरी प्रकल्पाबात देखील त्यांनी आरोप केले आहेत. त्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत राऊतांवर पलटवार केला आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासह सगळी लोकं आहेत. त्यांचं ओझं झालंय म्हणे. भाजपावर शिवसेना आणि एकनाथ शिंदेंचे ओझं झालंय, असं ते म्हणतात. पण उद्धव ठाकरेंचं ओझं आता मविआवर झालंय. १ मे रोजी होणारी मविआची सभा ही मविआची शेवटची सभा असेल. यापुढे वज्रमूठ सभा होणार नाहीत. यावर राऊतांनी स्पष्टीकरण द्यावं, असं नितेश राणे म्हणाले.

- Advertisement -

संजय राऊत शिवसेना आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य करतात. ज्या माणसाला शिवसेनेच्या स्थापनेची तारीखही माहिती नाही. त्याला शिवसेनेबदद्ल आणि बाळासाहेब यांच्याबाबत बोलण्याचा अधिकार आहे का?, हा मी राजकीय आरोप करत नाहीये, असं नितेश राणे म्हणाले.

एक मी व्हिडीओ दाखवतोय. या व्हिडिओतून संपूर्ण महाराष्ट्राला समजेल की, संजय राऊत नेमके कोण आहेत. हे चायनीज मॉडेल आहेत. बाळासाहेबांना हे शिव्या द्यायचे. शिवसेनेचा जन्म १९ जून १९६६ ला झाला आहे. पण राऊत म्हणतात शिवसेनेचा जन्म १९६९ला झाला. ज्या माणसाला शिवसेनेच्या स्थापनेचं वर्ष माहिती नाही. ते शिवसेनेबद्दल आम्हाला शिकवतायत. हे डुप्लिकेट आहेत, असं राणे म्हणाले.

- Advertisement -

एकाच दिवसात एवढा फरक पडेल अशी अपेक्षा नव्हती. मी संजय राऊतांना सांगेन की, एवढं पण सोपं मला देऊ नका. थोडं आरेला कारे झालं पाहिजे. ते माझी पत्रकार परिषद ऐकत असतील, असा मला विश्वास आहे. थोडी टीका पण करा म्हणजे मालकालाही समजेल राऊत नेमके कोणाचे आहेत. त्यांनी बारसूचा विषय काढलाय. मी पवारांचा माणूस आहे, असं संजय राऊत जोरजोरात बोलायचे. पण आज पवारांच्याच भूमिकेला विरोध करताना दिसले.

हे ना धड उद्धव ठाकरेंचे राहिलेत आणि ना आता पवारांचे राहिलेत, मग राऊत नेमके कोणाचे?, ते राजकारणामधले लावारिस आहेत का?, हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. बारसूमध्ये ज्यांनी जमीन विकत घेतल्या त्यांच्या याद्या जाहीर करणार असं त्यांनी सांगितलं आहे. नक्की करा, मग आम्ही पण याद्या जाहीर करतो.

जेव्हा बारसूचा विषय सुरू झाला तेव्हा माजी खासदार निलेश राणे यांनी ज्यांच्या बारसूमध्ये जमिनी आहेत, त्यांची नावं घेतली होती. त्यामधील काही जमिनी ठाकरेंच्या कशा आहेत. ठाकरेंच्या नावाने कशा जमिनी घेतलेल्या आहेत, तेव्हा त्यांनी काही नावं घेतलेली आहेत. विनायक राऊत आणि संजय राऊतांना जर नावं जाहीर करायचीच असेल किंवा मालकाला अडचणीत आणायचं असेल तर ते त्यांनी जाहीर करावं. ठाकरेंच्या निगडीत असलेल्या लोकांच्या जमिनी कशा आहेत. हे नावासकट आणि सातबाऱ्यासकट आम्ही जाहीर करणार आहोत. त्याची पण तयारी सुरू ठेवावी. पण स्थानिकांना विश्वासात घेतल्या शिवाय तो प्रकल्प होणार नाही, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे त्या प्रकल्पाबाबत तुम्हाला उलगडा करण्याची इच्छा असेल किंवा मालकाला अडचणीत आणण्याची इच्छा असेल तर, तुम्ही आणावं त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत, असं म्हणत राणेंनी राऊतांना टोला लगावला.

राहुल कुल यांच्या कारखान्यांबाबत आरोप करण्यात आले. परंतु ते चौकशीसाठी तयार आहेत. असंख्य कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे, असं संजय राऊत म्हणतात. तुम्ही पवारांना अडचणीत आणताय का?, असा काही तुमचा प्लान आहे का?, संजय राऊतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या निगडीत असलेल्या कारखान्यांची देखील चौकशी पाहिजे. हे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट दिसतंय, असंही राणे म्हणाले.


हेही वाचा : नॅशनल कॅन्सर इन्सिट्यूट उभारण्याचं फडणवीसांचं काम कौतुकास्पद- संजय राऊत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -