Tuesday, April 30, 2024
घरमानिनीAC आणि कूलर विनाही घर राहील कूल, वापरा या टीप्स

AC आणि कूलर विनाही घर राहील कूल, वापरा या टीप्स

Subscribe

उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी लोक एसी किंवा कूलर लावतात. पण कूलर किंवा एसी सतत वापरल्याने वीज बिलातही सातत्याने वाढ होत आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, एसी किंवा कूलर तुम्हाला उष्णतेपासून आराम देतो पण काही उपाय आहेत ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमचे घर थंड ठेवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही उपायांबद्दल सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घराची खोली एसीसारखी थंड ठेवू शकता.

खोलीत एक्झॉस्ट फॅन लावा

एसी आणि कुलर चालवल्याने विजेचे बिल तर वाढतेच पण काही वेळा शरीरात जडपणाही येतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमची खोली थंड ठेवायची असेल तर खोलीत एक्झॉस्ट फॅन नक्कीच लावा. ते खोलीतील गरम हवा बाहेर टाकते आणि संपूर्ण खोली थंड ठेवते.

- Advertisement -

बर्फाचा वापर

बर्फाचा ‘स्मार्ट’ वापर केल्यास घरात एसी सारखी थंड हवा निर्माण होते. घरात टेबल फॅन असेल तर तो लावताना त्याच्याखाली एका खोलगट भांड्यात बर्फाचे तुकडे ठेवा. फॅन चालू केल्यावर थंड गार वारा हवेत पसरेल आणि घरात थंडावा लवकर निर्माण होईल. रात्री झोपण्यापूर्वी जमीन थंड पाण्याने पुसली किंवा मॉबिंग केल्यास खोली थंड राहण्यास मदत होते.

पाणी फवारणी करा

जर उन्हाळयात घर थंड ठेवायचं असेल तर संध्याकाळी घराच्या छतावर थंड पाणी शिंपडा. यामुळे खोली थंड होईल आणि उकाडा जाणवणार नाही. तसेच जर तुम्ही तळ मजल्यावर राहत असाल तर अंगणात पाणी शिंपडा जेणेकरून घरात शुद्ध आणि थंड हवा येईल.

- Advertisement -

झाडं लावा

घरात थंडावा निर्माण करण्यासाठी झाडं महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. उन्हाळ्यात घराच्या दारात, गॅलरीत किंवा टेरेसमध्ये लहान किंवा मध्यम आकाराची झाडं ठेवा. झाडांमुळे घरात नैसर्गिकपणे थंडावा राहण्यास मदत होते. झाडं ऑक्सिजन सोडत असल्यामुळे घरातील हवा देखील शुद्ध राहते.

बल्ब, ट्युबलाईट

घरात हाय व्होल्टेज बल्ब आणि ट्युब लाईटचा अनावश्यक वापर टाळा. सतत बल्ब आणि ट्यूब लाईट चालू ठेवल्यास त्यामधून उष्णता बाहेर पडते. झोपण्यापूर्वी किमान 1 तास आधी बल्ब आणि ट्यूब लाईट बंद करा. म्हणजे रात्री झोपताना घरात थंडावा राहील. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एलईडी लाईटचा वापर अधिकाधिक करा. कारण त्यांचा प्रकाश चांगला पडतो, पण त्यात प्रखरता कमी असते.

हेही वाचा : Home Cleaning : घर स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरणारे तुरटीचे हॅक्स

________________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

- Advertisment -

Manini