घरमनोरंजनPushpa 2 Teaser : अर्धनारीचा लूक, भरजरी दागिने! Pushpa 2 चा टीझर...

Pushpa 2 Teaser : अर्धनारीचा लूक, भरजरी दागिने! Pushpa 2 चा टीझर रिलीज

Subscribe

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. पुष्पाची चाल, त्याचे फिल्मी संवाद, श्रीवल्ली गाण्यावर त्याचा डान्स, श्रीवल्लीचा लूक, सामंथा रुथ प्रभूचं ‘ऊ अंटावा’ गाणं इ. या सगळ्याच गोष्टी कमाल जमून आल्या आणि हा सिनेमा सुपरहिट ठरला आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची म्हणजे ‘पुष्पा 2 : द रूल’ची (Pushpa 2 : The Rule) चाहत्यांना उत्सुकता आहे.

‘पुष्पा 2’ चा पहिला टीझर 8 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘पुष्पा- द राईज’च्या अफाट यशानंतर निर्मात्यांनी आता ‘पुष्पा 2- द रुल’ चा टीजर प्रदर्शित केला आहे. आज 8 एप्रिल या चित्रपटातील मुख्य अभिनेता अल्लू अर्जुनचा वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी चित्रपटाचा जबरदस्त टीजर रिलीज झाला आहे. यात अल्लू अर्जुनचा हटके लुक पाहून चाहते उत्सुक झाले आहेत.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून ‘पुष्पा 2’मधील अल्लूच्या ज्या लूकने उत्सुकता वाढवली होती, तो साडीतील लूक या टीजरमध्ये पूर्ण दाखवण्यात आला आहे. महाकालीची पूजा ज्या मंडपात सुरू असते तिथे पुष्पा शंखनाद करताच एन्ट्री करतो. त्याच्या हातात त्रिशुळ, निळ्या-लाल रंगाची साडी, पायात घुंगरू, भरजरी दागिने, कानात मोठे झुमके, गळ्यात लिंबाची आणि फुलांची माळ, चेहऱ्यावर निळा-लाल रंग अशा लूकमध्ये ‘पुष्पा’ आहे. शिवाय तो साडीमध्येच त्याच्या दुश्मनांशी दोन हात करतो आहे.

- Advertisement -

चेहऱ्यावर रंगरंगोटी करून हातात अंगठ्या, दागिने आणि एका हातात बंदुक पकडलेल्या पुष्पाचा लूक पाहून चाहत्यांनी या टीझरवर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. या संपूर्ण 1 मिनिट 8 सेकंदाच्या टीझरमध्ये प्रेक्षकांना एकही संवाद ऐकायला मिळत नाही. सगळं लक्ष अल्लू अर्जुनवर केंद्रीत करण्यात आलं आहे.

या आधी 5 एप्रिलला रश्मिका मंदानाच्या वाढदिवशी मेकर्सनी तिचा चित्रपटातील पहिला लूक रिलीज केला होता. बहुचर्चित ‘पुष्पा 2’ यावर्षी 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच फहद फासिल (Fahadh Faasil) खलनायकाच्या भूमिकेत झळकेल.

____________________________________________

हेही वाचा : गारवा फेम गायक मिलिंद इंगळे यांचे नवीन गाणे “सुंदर कोकणराज…”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -