घरमहाराष्ट्रPen Summer News : गरिबांच्या फ्रिजला 'अच्छे दिन'

Pen Summer News : गरिबांच्या फ्रिजला ‘अच्छे दिन’

Subscribe

वडखळ : राज्यात दोन आठवड्यांपासून तापमानात मोठी वाढ होत आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हापासून थंड पाणी दिलासा देते. त्यामुळे गावागावात मातीच्या माठांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. फ्रिज सर्वांनाच परवडत नसल्यामुळे माठ खरेदीकडे सर्वसामांन्याचा ओढा असतो. त्याला रायगड जिल्ह्याचाही अपवाद नाही. त्यामुळे पेण तालुक्यात कुंभारांनी घडवलेल्या माठांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

काही वर्षांपूर्वी माठांची मागणी कमी झाली होती. त्यामुळे कुंभारांच्या व्यवसायावर गदा आली होती. त्यातच मडकी बनवण्यासाठी लागणारी माती, लाकडे, तुस, राखाडी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नव्हते. त्यातच कोरोनामुळे कुंभारांचे आर्थिक गणित कोलमडले होते. मात्र, फ्रिजमधील बर्फाळलेल्या थंड पाण्यामुळे होणारे सर्दी, खोकल्याचे आजार नकोत म्हणून लोक पुन्हा माठातील थंड पाण्याकडे वळले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad News : महामार्गांनी दिला रायगडमधील शेतकऱ्यांना रोजगार

त्यामुळे पुन्हा एकदा माठांची मागणी वाढली आहे. यंदा मातीच्या माठांच्या किमतीत जवळपास दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. मोठा मडका ५०० रुपये, मध्यम आकाराचा मडका ३०० रुपये तर लहान आकाराचे मडके अंदाजे २०० रुपयांना विकले जात आहेत.वाढत्या उन्हामुळे

- Advertisement -

किमतीत वाढ होत असली तरी उन्हाच्या तडाख्यातून तहान भागवण्यासाठी लोकांची पसंती माठांनाच मिळत आहे. त्यामुळे माठांच्या विक्रीची दुकाने महामार्गालगत तसेच तालुक्यात हमखात दिसत आहेत. तसेच गल्लोगल्ली माठ विक्रेते फिरताना दिसत आहेत. त्यामुळे घरोघरी तहान भागवणारे मडके दिसत आहेत.

हेही वाचा… Pen News : पेणमधील हेटवणे धरण्याच्या पाण्यामुळे बहरली उन्हाळी भातशेती

पिण्याच्या पाण्यापासून होणारे विविध आजार टाळण्यासाठी वॉटर फिल्टरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो. हे फिल्टर केलेले पाणी माठात ठेवल्यास ते स्वच्छ राहतेच शिवाय पाणी थंड झाल्याने ते पाणी उन्हाच्या कडाक्यात मनाला आनंदही देते. शिवाय माठातील पाणी चवदार असल्याचे ते पिऊन तहान भागते, असा सर्वांचा अनुभव आहे. त्यामुळे राज्यात उन्हाचा ताप वाढत असतानाच रायगडमधील गावागावांत मडक्यांची मागणी वाढत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -