Wednesday, May 1, 2024
घरमानिनीSweating a lot : जास्त घाम येतो? फॉलो करा या टिप्स

Sweating a lot : जास्त घाम येतो? फॉलो करा या टिप्स

Subscribe

उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाच्या तीव्र झळा आता जाणवू लागल्यात, त्यामुळे घामाचा त्रास सुरु झाला आहे. घाम येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या दिवसात शरीराचे तापमान नियंत्रीत करण्यासाठी शरीरातून घाम बाहेर पडतो. घाम आल्यावर शरीर थंड होते आणि घामातुन शरीरातील कचरा बाहेर टाकला जातो. त्यामुळे घाम येणे आरोग्यच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आणि आवश्यक असते.

अनेकांना खूप जास्त प्रमाणात घाम येतो. पण, डॉक्टरांच्या मते, जास्त प्रमाणात घाम येणे शरीरासाठी योग्य नाही. याशिवाय घामामुळे येणारा दुर्गंध नकोसा देखील वाटतो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात येणाऱ्या घामापासून कशी सुटका मिळवायची याबद्दल काही टिप्स सांगणार आहोत.

- Advertisement -

घामापासून सुटका होण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा –

कॅफीनयुक्त पदार्थ टाळा (Avoid caffeinated foods) 

कॅफिन शरीरासाठी हानिकारक असते. तज्ज्ञ, कायमच कॅफीनयुक्त पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन केल्याने शरीरातून जास्त घाम येतो. त्यामुळे कॅफीनचे सेवन टाळावे.

योगा करावा (Do yoga)

जर तुम्ही जास्त प्रमाणात घाम येण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर योगाचा सराव करा. योगाच्या मदतीने जास्त प्रमाणात घाम येण्याची समस्या दूर ठेवता येते. खरं तर, योगा केल्याने शरीरातील मज्जातंतू शांत राहतात आणि जास्त घाम येणे कमी होते.

- Advertisement -

सुती कपडे वापरा (Use Cotton cloths)

सुती कपडे घाम शोषून घेण्यास उपयुक्त ठरतात. सुती कपडे केवळ शरीराचा घाम शोषून घेत घेत नाही तर तर घामाचे लवकर बाष्पीभवन देखील करते.

तेलकट पदार्थ खाणे टाळा (Avoid oily food)

मसालेदार, तेलकट पदार्थांमुळे शरीरात घाम तयार होण्याचा वेग वाढत असतो.

अंघोळीच्या पाण्यात लिंबाचा वापर करा (Use lemon in bath)

घामाला दुर्गंधी येत असले तर अंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस वापरू शकता. याने दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल आणि घामातून येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळेल.

पेये प्या (Drink Liquid)

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पेये प्यावी. याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते आणि घाम येत नाही.

 

 


हेही पहा :  Health : फिट राहण्यासाठी फॉलो करा हा Formula

 

Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini