Thursday, May 16, 2024
घरमानिनीBeautyBeauty Tips : घरी Waxing करताना टाळा 'या' चुका

Beauty Tips : घरी Waxing करताना टाळा ‘या’ चुका

Subscribe

महिला (women) नको असलेले केस काढण्यासाठी वॅक्सिंगचा वापर करतात. वॅक्सिंगमुळे केसांची होणारी वाढ ही मंदावते आणि कालांतराने केसांची वाढ ही कमी होते. परंतु, अनेक महिलांना पार्लरमध्ये वॅक्सिंगला (waxing ) जाण्याची लाज वाटते किंवा काहींना पार्लरमध्ये वॅक्सिंगसाठी जास्त पैसे खर्च होतात, असे वाटते. अशा परिस्थितीत तुम्हाला घरीच पार्लरसारखे वॅक्सिंग (waxing at home) करू शकता. यासाठी तुम्हाला काही खास गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, जेणेकरून वॅक्सिंग करताना त्वचेला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही

वॅक्सिंग करण्यापूर्वी त्वचेवर कोणत्याही प्रकारचे तेल, मॉइश्चरायझर, क्रीम या गोष्टींचा वापर करू नका. हे लावल्याने वॅक्स योग्य पद्धतीने होत नाही. वॅक्सिंग करण्यापूर्वी, आपली त्वचा साबणाने पूर्णपणे स्वच्छ करू घ्या.

- Advertisement -

वॅक्सचे तापमान योग्य असणे गरजेचे

जर तुम्हाला घरीच वॅक्सिंग करायचे असेल तर सर्व प्रथम वॅक्स गरम करण्यासाठी योग्य तापमान असणे महत्त्वाचे असते. कारण, वॅक्सिंग करताना त्यांचे तापमान योग्य असणे गरजेचे असते. जर तुम्ही त्वचेवर थंड वॅक्स लावल्यास त्यांचा काही उपयोग होत नाही, कारण त्यांनी तुमच्या त्वचेवरचे केस देखील निघत नाहीत. या उलट तुम्हाला हे वॅक्स काढताना खूप त्रास होतो. पण, वॅक्स जास्त गरम असेल तर तुमची त्वचा जळण्याची शक्यता जास्त असते. यामुळेच वॅक्स गरम करताना त्यांचे तापमान योग्य असणे गरजचे असते. वॅक्सचे तापमान योग्य असेल तर तुमच्या त्वचेवरील केस योग्य पद्धतीने निघतात.

- Advertisement -

वॅक्सचा पातळ थर लावा

तुम्ही जर घरी वॅक्सिंग करत असला, तर तुम्हाला ही गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे की, जेव्हा ही तुम्ही त्वचेवर वॅक्स लावाल, तेव्हा एक पातळ थर लावा. तुम्ही सर्व केसांवर वॅक्स लावल्यानंतर तुम्हाला वॅक्सिंग करताना त्रास कमी होतो. तुम्ही त्वचेवर जास्त वॅक्स लावले तर, ते काढताना तुम्हाला केस व्यवस्थित निघणार नाहीत.

वॅक्सची पट्टी खूप वेगाने ओढू नका

महिला या वॅक्सिंगच्या त्रासापासून चांगल्याच परिचित असतात. या भतीने त्या घरीच वॅक्सिंग करतात. कारण, घरी त्या हळूहळू वक्सच्या पट्टी हळूवार पणे खेचून काढू शकतात. परंतु, वॅक्सच्या पट्टी हळूहळू काढणे योग्य नाही. या वॅक्सच्या पट्टी तुम्हाला योग्य फोर्स आणि योग्य पद्धतीने खेचून काढायच्या असतात, असे केल्याने तुम्हाला त्रास देखील कमी होतो आणि त्वचेवरील केसही निघतात. तुम्ही जर घरी वॅक्सिंग करणार असला तर तुम्हाला या सर्व गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते.

 


 

हेही वाचा – चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी लावा ‘हा’ फेस पॅक

- Advertisment -

Manini