घरमनोरंजनअभिनेत्री दीपिका कक्कर बाळाच्या जन्मानंतर घेणार 'हा' मोठ्ठा निर्णय

अभिनेत्री दीपिका कक्कर बाळाच्या जन्मानंतर घेणार ‘हा’ मोठ्ठा निर्णय

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कर लवकरच आई होणार आहे. दीपिका तिच्या प्रेग्नेंसीच्या काळातही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. दीपिका सतत तिच्याबाबत अनेक अपडेट सोशल मीडियावरून शेअर करत असते. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने अभिनय सोडण्याबाबत खुलासा केला आहे.

नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्री दीपिका कक्करने आई झाल्यानंतर अभिनय सोडण्याच्या निर्णयाबाबत खुलासा केला आहे. यावेळी ती म्हणाली की, “मी सध्या माझा प्रेग्नेंसी काळ आनंदात घालवत आहे आणि बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. मी खूप उत्सुक आहे की हे मी तुम्हाला शब्दांत सांगू शकत नाही. मी खूप तरुण वयात काम करायला सुरुवात केली होती आणि आता जवळपास मला 10-15 वर्ष पूर्ण झाली आहेत.”

बाळाच्या जन्मानंतर दीपिका सोडणार अभिनय

 

View this post on Instagram

 

A post shared by Dipika (@ms.dipika)

- Advertisement -

आपल्या करिअरबाबत बोलताना दीपिका म्हणाली की, “जेव्हा माझ्या प्रेग्नेंसीचा प्रवास सुरु झाला होता तेव्हा मी शोएबला म्हणाले होते की आता मला काम करायचे नाही आणि मला आता अभिनय सोडायचा आहे. मी आता एख गृहिणीसारखं आणि एका आईसारखं आयुष्य जगणार आहे.”

या मालिकांमध्ये दिसली होती दीपिका

दीपिका कक्कर यापूर्वी ‘कहां हम कहां तुम’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेत ती अभिनेता करण ग्रोवरसोबत दिसली होती. यात दीपिकाने सोनाक्षी ही भूमिका साकारली होती. या व्यतिरिक्त दीपिकाने ‘ससुराल सुमर का 2’मध्ये देखील कॅमियो केला होता. दीपिकाने मालिकांव्यतिरिक्त हिंदी टेलिव्हिजनवरील रियालिटी शोमध्ये देखील सहभाग घेतला होता. दीपिका ‘बिग बॉस 12’ ची विजेता झाली होती.

- Advertisement -

हेही वाचा :

Filmfare पासून IIFA पर्यंत… संजय लीला भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’चा डंका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -