थोड्या काही दिवसात तुमचे लग्न होणार आहे. तसेच लग्नाची तयारी करता करता स्किनची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तर मग घरगुती टिप्स आपण आता जाणून घेणार आहोत. ज्याच्या मदतीने तुमची स्किन तर सुंदर राहील आणि लग्नाच्या दिवशी एक खास ग्लो तुमच्यावर दिसून येईल. तसेच ज्या दिवशी लग्न आहे त्याच्या एक महिन्या आधीपासूनच हे स्किन केअर रुटीन चालू करा म्हणजे जेव्हा लग्न असेल त्या दिवशी किंवा त्याच्या आधी जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही.
तसेच जर का तुम्ही हाय प्रॉडक्ट्सचा वापर करून मेकअप करणार असाल तर तो मेकअप थोडे दिवस आधीच करून बघा. कारण तो मेकअप किंवा ते प्रॉडक्ट्स तुमच्या चेहऱ्याला सूट व्हायला हवेत. तसेच नॅचरल पद्धीतीने जर का लग्नाच्या आधी या टिप्स फॉलो केल्यात तर तुम्हाला काळजी करण्याचे काहीच कारण नाही. चला तर मग जाणून घेऊया ब्रायडल ग्लोसाठी काय काय केले पाहिजे.
1. दिवसातून दोनदा चेहरा धुवा
त्वचेची पोत सुधारण्यासाठी आणि चेहरा डागमुक्त ठेवण्यासाठी, तुम्ही CTM प्रक्रियेचे पालन केले पाहिजे. CTM म्हणजे क्लीनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. तसेच त्वचेची काळजी घेण्यासाठी या टप्प्याचे पालन करणे आवश्यक आहे. यामुळे दररोज चेहरा स्वच्छ धुवून त्याला टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग लावणे गरजेचे आहे.
2. फेस पॅक लावा
एलोवेरा जेलचा वापर प्रत्येक प्रकारच्या त्वचेवर केला जाऊ शकतो. एलोवेरा जेल हे फ्रिकल्सपासून सुरकुत्यापर्यंतच्या समस्या कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. ग्लोइंग स्किन दिसण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेलचा रात्रभर फेस पॅक लावून ठेवू शकता. हा फेसपॅक या पद्धतीने लावा ज्यामुळे स्किनला त्रास होणार नाही.
- 1 चमचे ताज्या कोरफडीच्या जेलमध्ये 2 चमचे मध मिसळा.
- एलोवेरा जेलपासून बनवलेला हा फेस पॅक रात्रभर चेहऱ्यावर ठेऊन झोपू शकता.
- तसेच रात्रभर फेसपॅक लावून सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवा.
3. आठवड्यातून एकदा चेहरा स्क्रब करा
डेड स्किनमुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा चेहरा स्क्रब करणं गरजेचं आहे. स्क्रबिंगमुळे डेड स्किन निघून जाते. तसेच स्क्रबसाठीचे जे काही घटक असतील ते त्वचेच्या प्रकारानुसारच वापरावेत. तसेच तुमची त्वचा तेलकट असेल तर आठवड्यातून दोनदा स्क्रब करणे फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर कोरडी त्वचा एकदाच स्क्रब करावी. बाजारातून स्क्रब विकत घेण्याऐवजी तुम्ही ते घरीही बनवू शकता. स्क्रब बनवण्यासाठी ही पद्धत वापरून बघा…
- स्क्रब बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुलाबाची पाने चांगली धुवावी लागतील.
- आता मिक्सरमध्ये गुलाबाची पाने आणि थोडे पाणी मिसळा.
- आता या पेस्टमध्ये एक कप साखर, दोन चमचे मध आणि गुलाब तेलाचे 8-10 थेंब घाला आणि सर्वकाही पुन्हा मिसळा.
- मग ही पेस्ट ब्रशच्या मदतीने चेहऱ्याला लावा.
- 15 ते 20 मिनटे हे लावून ठेवा. आणि मग साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.